Maharashtra Assembly 2024: भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांच्या मतदारसंघात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची सभा झाली. या सभेत पवार यांनी गिरीश महाजन यांना चांगलाच दम भरला. त्यावर उपस्थितांनी एकच जल्लोष केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जामनेर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार दिलीप खोडपे यांच्या प्रचारासाठी सभा झाली. यावेळी शरद पवार यांनी मंत्री गिरीश महाजन यांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, मंत्री महाजन हे अत्यंत यांच्या कारकिर्दीत मतदारसंघाचे अनेक प्रश्न सुटलेले नाहीत. त्यांनी मतदारसंघात नेमके काय केले? असा प्रश्न पडतो.
श्री पवार म्हणाले, जामनेर मतदार संघात जनतेचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. ते प्रश्न सोडविण्याची जबाबदारी मंत्री गिरीश महाजन यांची आहे. मात्र ते याबाबत फारसे काही करताना दिसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जनतेचे प्रश्न घेऊन गेले तर त्यांना दमदाटी करण्यात येते. त्यांना त्रास दिला जातो. मात्र त्यांना माझे स्वच्छ सांगणे आहे. योग्य काम असेल, अन् तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला चुकीची वागणूक दिली, तर खपवून घेणार नाही. याद राखा, "ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाबळी" या शब्दात श्री. पवार यांनी मंत्री महाजन यांना इशारा दिला.
यावेळी पवार म्हणाले, मतदारांना बदल हवा आहे. लोकसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी प्रस्थापितांना धक्के देणारे निर्णय मतदारांनी घेतले. नगर जिल्ह्यात सामान्य कार्यकर्ता असलेल्या निलेश लंके यांना मतदारांनी प्रचंड प्रतिसाद दिला. त्यामुळे एक सामान्य कार्यकर्ता आज संसदेत सामान्यांचे प्रश्न मांडण्यासाठी आमच्या सोबत काम करतो आहे.
जामनेरमध्ये देखील असेच काही होईल. अतिशय स्वच्छ प्रतिमा, सामान्यांसाठी कष्ट घेणारा, अभ्यासू, लोकांच्या प्रश्नांसाठी काम करणारा आणि शिक्षकी पेशातील एक चांगला उमेदवार जामनेर साठी आम्ही दिला आहे. त्यांना विजयी करा. जळगाव जिल्ह्याचा नावलौकिक सबंध महाराष्ट्रात होऊ द्या. दुसरीकडे कुठेही होत नाही ते जामनेरकरांनी करून दाखवले, असा संदेश या माध्यमातून जाईल.
यावेळी श्री पवार यांनी लोकसभा निवडणुकीचा संदर्भ दिला. ते म्हणाले भाजपच्या खासदारांनी आम्हाला 400 जागा हव्या आहेत. कारण आम्हाला संविधानात बदल करायचा आहे, असे म्हटले होते. संविधानावरील हा हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यास होणार होता. त्यामुळे आम्ही पुढाकार घेतला.
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, डावे पक्ष, `आप`चे अरविंद केजरीवाल आदी इंडिया आघाडीचे नेते एकत्र आले. त्याला महाराष्ट्रात अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे देशात भाजपला पूर्ण बहुमत मिळवता आले नाही. जळगाव सोडले तर महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांत चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे भाजपचे संविधान बदलाचे मनसुबे पूर्ण होऊ शकले नाहीत.
विधानसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील या निवडणुकीत राज्याचा कारभार कोणाच्या हाती सोपवायचा, हा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. महाराष्ट्राची आजची राजकीय स्थिती कशी आहे, हे आपण सर्व पहात आहोत. त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.