Vikas Lawande controversy Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Vikas Lawande controversy : ‘घुसखोर’ वक्तव्याने पेटली ठिणगी; राष्ट्रवादीच्या लवांडेंविरोधात कारवाईच्या मागणीचा जोर

Legal action demand rises in Ahilyanagar-Newasa after NCP spokesperson Vikas Lawande names 20 alleged infiltrators in the Warkari sect, including Bhaskar Giri Maharaj : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायातील घुसेखारांची नावे जाहीर केल्यावरून नवा वाद उभा राहिला आहे.

Pradeep Pendhare

Warkari Sampraday infiltrators : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायातील 20 घुसेखारांची नावे जाहीर केली आहेत. यावरून आता नवा वाद उभा राहू लागला आहे.

सकल हिंदू समाजाने साधू महंतांविरोधात 'घुसखोर', हा शब्दावर आक्षेप घेतला असून, विकास लवांडे यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. विकास लवांडे यांच्याविरोधात कायदेशीर करण्यात यावी, अशी मागणी अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा इथं करत सकल हिंदू समाजाच्यावतीनं निदर्शने करण्यात आली.

महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी सामाजिक न्याय व्यवस्था व स्वास्थ्य संकटात आणले आहे. हिंदू (Hindu) धर्मियांच्या भावना दुखवल्या आहेत. वारकरी संप्रदायातील विविध साधू, महंतांची नावे घेऊन त्यांना 'घुसखोर', हा शब्द वापरून अपमान केला आहे. सकल हिंदू समाजाच्या मनामध्ये यावरून रोष निर्माण झाला आहे.

राष्ट्रवादीचे (NCP) विकास लवांडे यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी. शांतता-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी तत्काळ अटक करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. विकास लवांडेंविरोधात कायदेशीर कारवाई न झाल्यास, आंदोलन, मोर्चे निघाल्यास प्रशासन जबाबदार राहील, असे निवेदनात म्हटलं आहे.

साधू महंतांबद्दल कोणताही विचार न करता, कागदोपत्री पुरावा न देता, कोणत्याही सक्षम न्यायालयांचे निर्णय न घेता, विकास लवांडे यांचे विधान समाजाला हानीकारण आहे. तहसील आणि पोलिस प्रशासनाने स्वतः हून फिर्याद नोंदवून घ्यावी आणि कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

निवासी नायब तहसीलदार चांगदेव बोरुडे व पोलिस निरीक्षक महेश पाटील यांना निवेदन देण्यात आले. सकल हिंदू समाज, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, श्री रामराज्य उत्सव समिती, श्री शिव प्रतिष्ठान हिंदूस्थान, स्वराज्य सौदामिनी प्रतिष्ठान, नेवासे तालूका वारकरी संप्रदाय, देवगड भक्त मंडळ यांनी निवेदन दिलं.

शरद पवारांचा लेख अन्...

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वारकरी संप्रदायासंदर्भातील लेखावरून राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. भाजप आणि हिंदूत्ववांद्याकडून पवारांवर टीका केली जात आहे. यानंतर प्रवक्ते विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायातील थेट 20 घुसखोरांची नावे जाहीर करत वादात आणखी भर घातली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT