

Paratwada sexual exploitation case : अमरावती जिल्ह्यातील अचलपूर-परतवाडा इथल्या अल्पवयीन मुलींच्या लैंगिक छळातील पीडितांची माहिती उघड होईल, असे भाष्य करणाऱ्या भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांच्या कायद्यानुसार अडचणी वाढू शकतात.
अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी राणांवर या प्रकरणात धार्मिक रंग देणे, पीडिताची माहिती उघड होईल असं भाष्य करणे, यामुळे ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे.
अमरावती (Amravati) इथल्या परतवाडा लैंगिक शोषणा देशात गाजत आहे. यामुळे हे प्रकरण खूप संवेदनशीलतेने हाताळावा लागेल, असे संकेत अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी दिले आहे. या प्रकणात कुठेही धार्मिक तेढ निर्माण होऊ याची काळजी घ्यावी लागेल, असे म्हटलं आहे.
तरी देखील काही जण हे प्रकरण चिघळवण्याचा प्रकार, विधानं करत आहेत. तिथं दंगल घडेल, अशा अफवा पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. यातच भाजपच्या (BJP) माजी खासदार नवनीत राणा यांनी याप्रकरणशी निगडीत केलेल्या भाष्यावर प्यारे खान चांगलेच संतापले आहेत.
परतवाडा प्रकरणात पीडित असलेल्या आठही मुली अल्पसंख्याक समाजाच्या आहेत. यात कोणताही हिंदू-अल्पसंख्याक अँगल नसताना नवनीत राणा यांनी जाणीवपूर्वक हा वाद भडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही प्यारे खान यांनी केला. नवनीत राणा यांनी केवळ सोशल मीडियावरील ‘रील्स’ आणि प्रसिद्धीसाठी हा बनाव रचल्याचा घणाघाती आरोपही त्यांनी केला.
ते म्हणाले, या घटनेची माहिती मिळताच आयोगाच्यावतीने परतवाडा इथं एक विशेष पथक पाठवण्यात आले होते. या दौऱ्यानंतर अमरावतीचे पोलिस आयुक्त राकेश ओला यांच्याशी चर्चा केली. अफवा पसरवणारा नेता कितीही मोठा असला तरी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी पोलिसांना दिले आहेत.
पीडित मुलींच्या पालकांनीही नवनीत राणा यांच्याविरुद्ध तक्रार करण्याची इच्छा व्यक्त केल्याचे प्यारे खान यांनी सांगितले. या प्रकरणातील आरोपींना कोणत्याही प्रकारचे समर्थन दिले जाणार नाही, असा पवित्रा अल्पसंख्याक समाजाने घेतला आहे. अमरावतीत असताना नवनीत राणा यांना या घटनेची माहिती आधी का मिळाली नाही, असा सवाल करत त्यांनी राणा यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.