Sharad Pawar | Raosaheb Danve Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sharad Pawar : रावसाहेब दानवेंची कार्यकर्त्यांला 'फाईट'; शरद पवार म्हणाले, त्यांच्या पक्षात सहकाऱ्यांना कसं वागवलं जातं याचं...

Raosaheb Danve Video Kicking Activist: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मोदींनी महाराष्ट्रात सोळा ठिकाणी सभा घेतल्या. त्यांच्या ज्या ठिकाणी सभा झाल्या त्या १६ पैकी ११ ते १२ ठिकाणी भाजपचा उमेदवारांचा पराभव झाला.

Mangesh Mahale

Jalgaon News: भाजपचे माजी खासदार रावसाहेब दानवे हे नेहमीच चर्चेत असतात, आपल्या बोलण्याच्या शैलीमुळे ते अडचणीत आल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या आहेत पण आता दानवे यांनी केलेल्या कृतीमुळे ते वादात सापडले आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप आणि दानवेंना टोला लगावला.

शरद पवार हे सध्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांचा बालेकिल्ला असलेल्या जामनेर येथे त्यांनी सभा होणार आहे. रावसाहेब दानवे यांनी केलेल्या कृतीमुळे पवारांना विचारले असता "त्यांच्या पक्षात सहकाऱ्यांना कसं वागवलं जाते, याचे हे उदाहरण आहे," असे शरद पवार म्हणाले.

निवडणूक आयोगाच्या पथकाने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बॅगा तपासल्या. यावर विचारलेल्या प्रश्नावर पवार म्हणाले, "विरोधकांना कसा त्रास द्यायचा हे सत्ताधाऱ्यांनी ठरवलं आहे,"

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात सभा होत आहे, याबाबत पत्रकारांनी त्यांना विचारले असता पवार यांनी लोकसभा निवडणुकीत मोदींनी महाराष्ट्रात घेतलेल्या सभांची आठवण करुन देत मिश्किलपणे टिप्पणी केली.

"लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मोदींनी महाराष्ट्रात सोळा ठिकाणी सभा घेतल्या. त्यांच्या ज्या ठिकाणी सभा झाल्या त्या १६ पैकी ११ ते १२ ठिकाणी भाजपचा उमेदवारांचा पराभव झाला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही मोदींनी जास्तीत जास्त सभा घ्याव्यात," असे पवार म्हणाले.

शिवसेनेचे उमेदवार अर्जुन खोतकर यांच्यासोबत रावसाहेब दानवे फोटो काढत असताना या फोटोमध्ये एक कार्यकर्ता आल्याने दानवेंनी त्या कार्यकर्त्याला थेट लाथ मारून बाजूला केले. त्यांचा हा लाथ मारण्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. दानवेंच्या या कृतीवर भाजप नेत्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.

रावसाहेब दानवे यांचा हा व्हिडीओ शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एका सभेत दाखवला. "अशा पद्धतीने हे जर लोकांना लाथा घालत असतील तर जनता यांना लाथाडल्याशिवाय राहणार नाही. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देण्याची चळवळ म्हणजे बाबासाहेबांची चळवळ आहे. महापुरुषांनी आम्हाला मानवतेचा वसा दिलाय. असे व्हिडीओ पाहिल्यानंतर वाटतं की, भाजपने तयार केलेले हे लोक अशा पद्धतीने वागवतात. 20 तारखेला मतदानाला जाताना हा व्हिडीओ लक्षात ठेवा,"

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT