Rupali Chakankar: नोटीस पॅालिटिक्स: सुप्रिया सुळेंचा दावा खोटा; 'ती' नोटीस कुणाला? चाकणकरांची पुन्हा स्पष्टोक्ती

Rupali Chakankar Responds to Supriya Sule Notice: खासदार सुप्रिया सुळे यांनी नोटीस दाखवल्यानंतर आता रुपाली चाकणकरांनी ती नोटीस नेमकी कुणाला पाठवली आहे. याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
Vadgaon Sheri Assembly Constituency 2024
Vadgaon Sheri Assembly Constituency 2024Sarkarnama
Published on
Updated on

Vadgaon Sheri Assembly Constituency: पुण्यातील पोर्शेकार अपघात प्रकरणात वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार,आमदार सुनील टिंगरे यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. यावरुन टिंगरे यांनी यांनी महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षांना धमकीवजा इशारा दिला आहे. "जर तुम्ही पोर्शेकार अपघातामध्ये माझी बदनामी केली, तर तुम्हाला कोर्टात खेचू" अशा प्रकारचा इशारा दिल्याची माहिती नोटीसमध्ये आहे. टिंगरेंच्या नोटिशीवरुन आता राजकारण रंगलं आहे.

सुनील टिंगरे यांच्याकडून शरद पवार यांना नोटीस पाठवण्यात आल्याचं एका प्रचार सभेदरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं होतं. टिंगरे यांनी याबाबत खुलासा करीत आपण शरद पवार यांना आपण नोटीस पाठवली नसून तीनही पक्षाना नोटीस पाठविल्याचे सांगितले आहे. यावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सुळेंना नोटीस दाखवण्याचे आव्हान केले होते. त्यानंतर सुळेंनी पत्रकार परिषद घेत ती नोटीस दाखवली.

सुळे यांनी नोटीस दाखवल्यानंतर आता रुपाली चाकणकरांनी ती नोटीस नेमकी कुणाला पाठवली आहे. याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. सुनील टिंगरे यांनी शरद पवार यांनी कुठलीही नोटीस पाठवलेली नाही, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस पक्षाला नोटीस पाठवली आहे, असे चाकणकरांनी ती नोटीस दाखवत सुप्रिया सुळे यांनी केलेला दावा खोडून काढला आहे. याबाबत त्यांनी एक्सवरुन व्हिडिओ शेअर केला आहे.

Vadgaon Sheri Assembly Constituency 2024
Riteish Deshmukh: लाडक्या भावाच्या प्रचारात अभिनेत्याची झापुक झुपूक एन्ट्री: लातुरच्या सभेत 'लयभारी' डायलॉगबाजी

"टिंगरे यांनी तीनही पक्षांना नोटीस पाठवली आहे. शरद पवार यांना नोटीस पाठवलेली नाही. अशा पद्धतीने खोटी विधाने करुन, खोटी भाषा वापरुन, शरद पवार यांना नोटीस पाठवली, असे सांगून सहानुभूती निर्माण करणे शक्य होणार नाही.जे काय सत्य आहे ते वडगाव शेरीकरांच्या समोर आले पाहिजे," असे चाकणकर म्हणाल्या.

Vadgaon Sheri Assembly Constituency 2024
Ajit Pawar: शिवतारेंच्या विरोधातील सभेला अजितदादांनी मारली दांडी, शहांना भेटण्यासाठी मुंबई गाठली! नेमकं काय घडलं ?

"पवार साहेबांना वैयक्तिक मी कोणतीही नोटीस पाठवलेली नाही. मध्यंतरीच्या काळामध्ये जी चुकीची माहिती मिळाली होती. त्याच्या आधारे अनेक नेते आणि प्रवक्ते यांच्याकडून काही वक्तव्य करण्यात आली. माझी बदनामी झाली तर आता मी या विधानसभेचा उमेदवार म्हणून आता इलेक्शनमध्ये ते पुन्हा एकदा कोणत्याही व्यक्तीकडून चुकीची माहितीच्या आधारे कोणती वक्तव्ये होऊ नये, अशा पद्धतीची त्यांना नोटीस दिलेली आहे," असा खुलासा यापूर्वी टिंगरे यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com