Chhagan Bhujbal, Sharad Pawar & Manikrao Shinde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sharad Pawar Politics: शरद पवारांच्या सभेने छगन भुजबळ मतदारसंघात झाले सक्रीय...

Sharad Pawar; Pawar`s Public meeting turn election of Chhagan Bhujbal in Yeola-शरद पवार यांच्या येवला येथील विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेला मंगळवारी मिळालेल्या प्रतिसाद उस्फूर्त होता.

Sampat Devgire

Assembly election 2024: येवला मतदार संघातच नव्हे तर राज्याच्या राजकारणात छगन भुजबळ आता शरद पवार यांचे प्रमुख राजकीय टार्गेट आहेत. मंगळवारी येवला येथे झालेल्या सभेत पवार यांनी तसे थेट सुचित केले. त्यामुळे मतदार संघात ही सभा भुजबळ यांचा `करेक्ट` कार्यक्रम करणार का? याची चर्चा सुरू झाली आहे.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात बलाढ्य भाजप आघाडी आणि त्यांच्या प्रबळ उमेदवारांना अनेक सामान्य उमेदवारांनी पराभूत केले. हा चमत्कार शरद पवार यांनी आखलेल्या राजकीय डावपेचा भाग होता. विधानसभा निवडणुकीतही शरद पवार यांनी काही मतदारसंघात त्याची पुनरावृत्ती केली आहे. यामध्ये येवला मतदार संघ देखील आहे.

मंत्री छगन भुजबळ हे निवडणुकीचे नियोजन साधनसामुग्री आणि प्रचार तंत्र या सर्वच अंगाने प्रबळ मानले जातात. निवडणूक जिंकण्यासाठी ते कोणताही पर्याय शिल्लक ठेवत नाही. यंदा त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने माणिकराव शिंदे हे सामान्य उमेदवार दिले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात "धनशक्ती विरुद्ध जनशक्ती" अशी प्रचार सुरू झाल्याचे वक्तव्य कालच्या सभेत भुजबळ विरोधकांनी केले.

येवला येथील सभेत शरद पवार यांचा उत्साह आणि आक्रमकता काही वेगळेच संकेत देत होती. सामान्यतः श्री पवार क्वचितच आक्रमक बोलतात. मात्र येवल्यात त्यांनी छगन भुजबळ यांना विविध विशेषणे वापरली. उपमुख्यमंत्री पदापासून तर अनेक महत्त्वाची पदे आणि ताकद भुजबळ यांना दिली. या प्रत्येक वेळी त्यांनी गडबड आणि घोटाळे केले. त्यात त्यांना मी वाचवले.

श्री. भुजबळ यांच्यामुळे पक्षाला आणि नेत्यांना त्याची किंमत चुकवावी लागली. आमची सत्ता गेली. मात्र भुजबळ यांच्या चुका प्रत्येक वेळी आम्ही पोटात घेतल्या. त्याची परतफेड छगन भुजबळ यांनी कशी केली? हे जनतेला माहित आहे. भुजबळ यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी मोठे केले. त्यांनी त्यांच्याच विरोधात कारस्थान केले. ज्यांनी ज्यांनी त्यांना मोठे केले त्यांना त्यांच्याशी त्यांनी धोके केले. श्री. भुजबळ हे धोकेबाज आहेत, असा गंभीर आरोप पवार यांनी केला.

श्री. पवार म्हणाले, ते पुन्हा तुमच्याकडे मत मागायला आले आहेत. अशा व्यक्तीला मतदान करू नका. येवल्याचे नाव त्यांच्यामुळे बदनाम झाले. येथील जनता सुज्ञ आहे. ती योग्य वेळी योग्य निर्णय करते. त्यावेळी देखील भुजबळ यांना येवल्यात आणून माझी चूक झाली. ही चूक आता येवल्याची जनता दुरुस्त केल्याशिवाय राहणार नाही.

माणिकराव शिंदे हे एक सामान्य मात्र एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. त्यांच्या पाठीशी सगळ्यांनी उभे राहिले पाहिजे, असे आवाहन श्री पवार यांनी केले. विशेष म्हणजे कालपर्यंत श्री भुजबळ मला मतदारसंघात जाण्याची गरज नाही, असे सांगत असल्याचे दिसत होते. मात्र पवार यांची सभा होतात भुजबळ यांचे हेलिकॉप्टर देखील येवल्यात लँड झाले. आज सकाळीच भुजबळ मतदार संघात जिल्हा परिषद गटनिहाय गावांमध्ये प्रचार दौरे करायला बाहेर पडले आहेत. हे सर्व सूचक आहे.

श्री भुजबळ हे डावपेचांत कसलेले आहेत. माध्यमांतून विविध सोयीचे संदेस व पारंपारीक राजकारणात तरबेज आहेत. कालच्या सभेने मिळालेला संदेश घेऊन ते अधिक आक्रमक आणि जोरात कामाला लागतील, असे चित्र आहे. अधिक ताकद प्रचारात आणि मतदारांना आकर्षित करण्यासाठी ते वापरतील हे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यामुळे आता ही निवडणूक येवल्याच्या सामान्य मतदारांच्या हाती गेली आहे. मतदारच निवडणुकीचा निकाल घेतील, असे शरद पवार यांच्या सभेतून जाणवू लागले आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT