Sharad Pawar : शाळेतील विद्यार्थिनीसुद्धा सुरक्षित नाहीत; शरद पवारांची महायुती सरकारवर टीका

Political News : राज्यातील आमची बहिण लाडकी आहे. एका बाजूने अर्थसहाय्य करायचं आणि दुसरीकडे महिलांवरील अत्याचार वाढत चालले आहेत. शाळेतील विद्यार्थिनी सुद्धा आज सुरक्षित नाहीत, अशी टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Nagar News : पीएम मोदी लोकसभा निवडणुकीत 400 जागा द्या, असे म्हणत होते. पन्नास टक्के आले तरी बहुमत होते मग 400 पार कशाला पाहिजे होते. आम्ही विचार केल्यावर लक्षात आले की यांना संविधान बदलायच आहे. आता महाराष्ट्राची निवडणूक आली आहे. त्याआधी काही योजना त्यांनी आणल्या आहेत. या राज्यातील आमची बहिण लाडकी आहे. एका बाजूने अर्थसहाय्य करायचं आणि दुसरीकडे महिलांवरील अत्याचार वाढत चालले आहेत. शाळेतील विद्यार्थिनी सुद्धा आज सुरक्षित नाहीत, अशी टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली. (Sharad Pawar News)

कोपरगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार संदीप वर्पे यांच्या प्रचारासाठी आयोजित प्रचार सभेप्रसंगी ते बोलत होते. गेल्या आठ महिन्यात महिलांच्या अत्यचाराच्या घटना वाढल्या आहेत. पोलिसांना आरोपी हाती लागत नाहीत. महिलांना सन्मान द्यायचा आहेच पण संरक्षण महत्वाचे आहे. त्यासाठी आम्ही कार्यक्रम हाती घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

Sharad Pawar
Uddhav Thackeray : दुसऱ्यांदा बॅग तपासणी, आता मोदींची बॅग महाराष्ट्रातून जाताना तपासा; ठाकरेंचे निवडणूक आयोगाला चॅलेंज

मी कृषिमंत्री असताना आम्हाला कळले की एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. त्यानंतर चौकशी केली आणि आत्महत्येच कारण जाणून घेतले. त्यानंतर मनमोहन सिंग यांच्याशी चर्चा करून यवतमाळ भागात दौरा केला आणि त्यानंतर पूर्ण कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला. आज काय अवस्था आहे. मोदी साहेबांच्या सरकारमध्ये उद्योगपतींचे कर्ज माफ केले जाते. यांचं राज्य शेतकरी हिताचं नाही. पंचसूत्री कार्यक्रमाची माहिती देत त्यांनी महाविकास आघाडीची सत्ता आली तर महाराष्ट्राचा चेहरा बदलून टाकण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

Sharad Pawar
Nitin Gadkari : टीव्ही फोडण्याची धमकी दिली म्हणून बापाने दिले मुलाला तिकीट; नितीन गडकरी यांची टोलेबाजी

माझ्या मंत्रिमंडळात शंकरराव काळे आणि कोल्हे होते. त्यानंतर आशुतोष काळेच्या सभेला मी मागच्या निवडणुकीत आलो होतो. त्यामुळे ते निवडून आले होते. त्यानंतर त्यांना साईबाबा संस्थान प्रमुख करून राज्यमंत्र्याचा दर्जा दिला होता. रयतच्या चेअरमनपदाची जबाबदारी दिली होती. त्यांच्यावर विश्वास ठेवला मात्र त्या विश्वासाला त्यांनी दगा दिला. त्यांचे रस्ते त्यांनी बदलले, अशी टीका शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली.

Sharad Pawar
Uddhav Thackeray Video : मोठी बातमी! हेलिपॅडवर बॅगांची तपासणी, उद्धव ठाकरेंनी घेतली निवडणूक अधिकाऱ्यांची झाडाझडती

आज निवडणुकीत पैशाची उधळण होते. कुठून पैसे येतात माहित नाही. दारूचे कारखाने चालवणाऱ्यांची अवस्था अशीच असते. ज्यांना संधी दिली ज्यांना सगळं दिलं त्यांनी आम्हाला काय दिलं तर पक्ष बदलला. अशा लोकांना पाठिंबा कधीही देऊ नका. संदीप वर्पे सारख्या सामान्य माणसाच्या पाठीशी उभे रहा. त्याच्या पाठीशी मी कायम उभा राहील, असे आवाहन यावेळी शरद पवार यांनी केले.

Sharad Pawar
Nitin Gadkari: CM कोण होणार? गडकरींनी सांगितली एका सिनेमाची गोष्ट; 'सध्या अनेक टक्कलवाले कंगवा घेऊन फिरताहेत... ' VIDEO पाहा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com