NCP Foundation Day Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sharad Pawar Politics : राष्ट्रवादीचे अधिवेशन नगरला मात्र कौतुक झाले नाशिकचे; हे आहे कारण....

Sampat Devgire

Nashik NCP News : शरद पवार आणि नाशिक यांचे एक अनोखे राजकीय नाते आहे. त्या नात्याचा उल्लेख काल पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगर येथील अधिवेशनात झाला. त्याला कारणीभूत ठरला एक युवा शेतकरी.

या युवा शेतकऱ्याचं नाव आहे किरण सानप. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त नगर येथे अधिवेशन झाले. या अधिवेशनात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी किरण सानप यांचे कौतुक करीत विशेष उल्लेख केला. यावेळी किरण कांद्याची माळ घालून अधिवेशनाला आला होता.

यावेळी जयंत पाटील म्हणाले, नाशिक जिल्हा पवार साहेबांसाठी अक्षरश: वेडा होऊन कष्ट करीत होता. लोकसभा निवडणुकीत प्रयत्नांची शिकस्त करीत होता. त्यामुळे शेतकरी वर्गाच्या प्रश्नांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस मनापासून मैदानात उतरलेला दिसला त्यामुळे मतदारांनी ही त्याच्यावर भरभरून मतांचा वर्षाव केला.

पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पिंपळगाव बसवंत येथील सभेत युवा शेतकरी किरण सानप याने पंतप्रधान मोदी यांच्या सभेत जाऊन त्यांना कांदा विषयावर बोला, असे म्हटले होते. त्याची ती हिम्मत नाशिककरांची हिंमत आहे. या हिमतीला मी सलाम करतो.

एव्हढा हिम्मत बाद शेतकरी मी पाहिला नाही, असे सांगत त्यांनी किरण सानप याचे कौतुक केले. जयंत पाटील यांच्या या वक्तव्यावर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या शेजारी बसलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही टाळ्या वाजवून कौतुक केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अधिवेशन काल नगरला झाले त्यात लोकसभा निवडणुकीतील यशाबद्दल कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा खास उल्लेख सर्वच नेत्यांनी केला. मात्र नगरच्या या अधिवेशनात चर्चा झाली ती किरण सानप यांची. भाव खाऊन गेले ते नाशिक. त्यामुळे हे अधिवेशन कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय ठरले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT