Sharad Pawar at Chandwad Rasta Roko Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sharad Pawar News : शरद पवारांचं आंदोलन चांदवडला,पण अस्वस्थता दिल्लीत!

Sampat Devgire

Sharad Pawar Vs BJP : आधी निर्यातबंदी करायची, नंतर सरकार म्हणते आम्ही चर्चा करतो, ते असे म्हणतात, कारण त्यांना माहिती आहे, चांदवडला शेतकरी रस्त्यावर उतरणार आहे. केंद्र सरकार एखादा निर्णय घेते, तेव्हा त्याचा शेतकऱ्यांवर काय परिणाम होईल, याचा विचार करीत नाही का. तेव्हा कोणाशी चर्चा करता?, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. (Sharad Pawar blaim on BJP & Centre Government On Farmers Policy)

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत मंगळवारी चांदवड (नाशिक) येथे मुंबई- आग्रा महामार्गावर आंदोलन झाले. यावेळी लगतच्या तालुक्यांतून देखील शेतकरी एकत्र आले होते. त्यांनी थेट भाजपला (BJP) दोषी ठरवत आपला संताप व्यक्त केला. या मतदारसंघांचे भाजपचे प्रतिनिधी असूनही हा निर्णयावर शेतकऱ्यांना न्याय देण्यात सरकार कमी पडलं, अशी टीका यावेळी करण्यात आली.

यावेळी शरद पवार म्हणाले, केंद्रात जे नेते बसले आहेत, त्यांना शेतकऱ्यांशी फारसे काहीच देणे घेणे नाही. शेतकऱ्यांना दोन पैसे मिलत असतील, तर इतरांनी विरोध करायचे काहीच कारण नाही. मी केंद्रात कृषिमंत्री असताना असे कांदा दर वाढल्यावर भाजपने सभागृह डोक्यावर घेत गोंधळ केला होता. मला त्याची माहिती मिळाल्यावर नाशिकहून थेट विमानाने दिल्लीला गेलो व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात निर्यातबंदीचा सरकारचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, दुसऱ्या दिवशी सभागृहात भाजपने पुन्ह गोंधळ घातल्यावर, मी स्पष्टपमे नकार देत, कांदा निर्यातबंदी करणार नाही. भाव वाढले तरी चालतील. शेतकऱ्यांना काही लाभ होत असेल तर त्याचा आड कोणीही येऊ नये. मी ते सहन करणार नाही. एकंदर जेवनामध्ये विविध घटकांचा विचार केला तर कांदा किती असतो?. हवा तर कांदा खाऊ नका, असे धोरण आम्ही स्विकारले होते. सध्याचे सरकार मात्र कांदा पिकवणारे मोजकी राज्य असल्याने ते शेतकऱ्यांचा विचार करीत नाहीत, अशी टीका पवारांनी केली.

यानिमित्ताने महाविकास आघाडीचे सर्वच नेते एकत्र आले होते. हे आंदोलन चादंवडला झाले, मात्र भाजपचे काही नेते सातत्याने दिल्लीत त्याची माहिती देत होते. दिल्लीत या विषयावर चर्चा सुरू असल्याचे आंदोलनावेळी शेतकऱ्यांना सांगत होते. एकंदरच शरद पवारांचे आंदोलन चादंवडला मात्र दिल्लीत भाजप अस्वस्थ झाल्याचे चित्र होते.

यावेळी काँग्रेसचे माजी आमदार शिरीष कोतवाल, डॉ. तुषार शेवाळे, डॉ. सयाजी गायकवाड, श्रीराम शेटे, माणिकराव शिंदे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते डॉ. जी. एल. कराड, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र भोसले, गजानन शेलार, कोंडाजी मामा आव्हाड, गोकुळ पिंगळे, लक्ष्मण मंडाले, माजी आमदार संजय चव्हाण, दीपिका चव्हाण, माजी आमदार गणेश धात्रक, नितीन आहेर, माजी आमदार अनिल कदम, दिलीप मोरे यांसह महाविकास आघाडीचे विविध नेते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT