Shivsena Politics : दादा भुसे हे पूर्णतः अपयशी पालकमंत्री!

Shivsena Dy, Leader criticized Guardian Minister Dada Bhuse On Drug crime-ड्रग्ज प्रकरणात मंत्री भुसे यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत मी ठाम असल्याचा पुनरूच्चार सुषमा अंधारे यांनी केला.
Sushma Andhare & Dada Bhuse
Sushma Andhare & Dada BhuseSarkarnama
Published on
Updated on

Sushma Andhare Vs Dada Bhuse : विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मतदारांनी ठाकरे आणि शिवसेना या नावावर मते दिली आहेत. गद्दारी करताना तुम्ही हे विसरलात मात्र, जनता विसरलेली नाही, त्यामुळे येत्या निवडणुकीत गद्दारांचा पराभव करून शिवसेनेचाच उमेदवार विजयी होईल, असा दावा शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला. (Shivsena followers vote in the name of Shivsena & Thackeray not Shinde)

शिवसेनेच्या (Shivsena) महाप्रबोधन यात्रेनिमित्त सुषणा अंधारे नाशिकमध्ये (Nashik) आहेत. काल त्यांची मनमाडमध्ये सभा झाली. आज सायंकाळी त्यांची सिडको येथे सभा होणार आहे. यावेळी त्यांनी आमदार सुहास कांदे, पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) तसेच भारतीय जनता पक्षावर (BJP) गंभीर आरोप केले.

Sushma Andhare & Dada Bhuse
Sushama Andhare News : मुख्यमंत्री महोदय कायदा टेंभी नाक्याच्या दावणीला बांधलाय काय ? अंधारेंचा खरमरीत सवाल

यावेळी त्यांनी एमडी ड्रग्ज प्रकरणातील आरोपी ललित पाटील याच्याशी संबंधित विषयावर पालकमंत्री दादा भुसे यांना अनेक प्रश्न केले. त्या म्हणाल्या, ललित पाटील 'मातोश्री'वर आला होता. मात्र मातोश्रीवर येणाऱ्या प्रत्येकाची नोंद असते. त्यासाठी दादा भुसे यांनी किती प्रयत्न केले होते, हे आम्ही जाहीर करायचे का?

नाशिकला ड्रग्ज निर्मितीचा कारखाना आढळला. त्यात ललित पाटील आरोपी आहे. सध्या त्याला नाशिकच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याच पाटीलने ड्रग्ज निर्मितीचा कारखाना काढला. साधे ब्युटी शॉप काढायचे असेल तरीही परवाना लागतो. मग एवढा मोठा कारखाना तुमच्या लक्षात आला नाही. आला नसेल तर पालकमंत्री म्हणून तुम्ही नक्कीच अपयशी आहात.

सुषमा अंधारे यांनी ससून रुग्णालयातील अधिकाऱ्यांविषयी प्रश्न उपस्थित केला. त्या म्हणाल्या, असा कोणता आजार आहे की, त्या आजारासाठी नऊ महिने दवाखान्यात ठेवले जाते?. कारागृहातून एखाद्या रुग्णाला अन्यत्र हलवायचे असेल तर त्याची एक प्रोसेस असते. मग ललित पाटील बाहेर कसा आला?. यासंदर्भात चौकशी समितीने देखील सांगितले की, ससून रुग्णालयाचे डीन संजीव ठाकूर दोषी आहेत. तरीही अद्याप संजीव ठाकूर यांना अटक का केली नाही? त्यांची नार्को टेस्ट व्हावी, यावर मी ठाम आहे.

Sushma Andhare & Dada Bhuse
Mahua Moitra : खासदारकी वाचवण्यासाठी महुआ मोईत्रा ॲक्शन मोडवर; सर्वोच्च न्यायालयात याचिका

त्या म्हणाल्या, फक्त डॉ. ठाकूर यांना अटक केल्याने हे प्रकरण संपत नाही. ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात जे अटक झाले, ते सगळे हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतरचे आहेत. मात्र या प्रकरणातील अगोदरच्या घटनांचे काय? असा प्रश्न त्यांनी केला. खासदार हेमंत गोडसे यांचा देखील गर्दीतील नव्हे तर गणपती दर्शनाचा फोटो आहे. त्यामुळे ड्रग्ज प्रकरणात कोण कोण सामील आहे, त्यांची चौकशी झालीच पाहिजे.

Sushma Andhare & Dada Bhuse
Sharad Pawar: कांदा उत्पादकांसाठी शरद पवार रस्त्यावर; चांदवडला आज राष्ट्रवादीचा रास्ता रोको

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com