Sharad Pawar, Amol Kolhe News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sharad Pawar Nashik News : खासदार कोल्हे आता राष्ट्रवादीचे 'ओबीसी' नेते? शरद पवार म्हणाले

सरकारनामा ब्यूरो

Sharad Pawar Nashik Tour : अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. राष्ट्रवादीच्या फुटीमध्ये शिरुरचे खासदार अमोल कोल्हे हे शरद पवार यांच्या सोबत आहेत. आज (ता.८ जुलै) शरद पवार यांच्या नाशिक दौऱ्यातही अमोल कोल्हे (Amol Kolhe) सहभागी आहेत. यामुळे राष्ट्रवादीचा ओबीसी चेहरा आता अमोल कोल्हे असणार का? असा प्रश्न शरद पवार यांना यावेळी विचारण्यात आला होता.

शरद पवार (Sharad Pawar) यांनी नाशिकमध्ये पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पवार म्हणाले, कलेच्या क्षेत्रात काम करत असताना सामाजिक जबबादारीची भावना त्यांच्या बोलण्यातून येत होती. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये (NCP) येवून लोकांचे काम करावे, असा आग्रह मी स्वता: त्यांना केला होता. त्यामुळे ते राष्ट्रवादीमध्ये आले. त्यांना शिरुर लोकसभा मतदारसंघात लोकांनी मोठ्या मताधिक्याने निवडून दिले, असे पवार यांनी स्पष्ट केले.

यावेळी नाशिमध्येच पहिली सभा का? याचे उत्तर पवार यांनी दिले. त्यावर पवार म्हणाले, पुलोद सरकारच्या काळात नाशिकमधून बारा आमदार बिनविरोध निवडून आले होते. त्याचप्रमाणे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना नाशिककरांनी लोकसभेत बिनविरोध निवडून दिले होते. विचारांशी एकसंघ राहिलेले तसेच आमच्या विचारांना मानणारा मोठा वर्ग नाशिकमध्ये असल्याने नाशिक मधून भूमिका मांडण्याची सुरुवात केली, असे पवार यांनी यावेळी सांगितले.

माझ्या वयाचा मुद्दा आलाच कुठे, मोरारजी देसाई पंतप्रधान असताना त्यांचे वय 84 होते. मात्र, प्रकृती चांगली असल्याने त्यांच्याकडून कामे चांगली होत होती. आताही ज्यांनी पक्ष सोडला ते 70 च्या पुढे आहेत. सर्व काही असताना सुप्रिया सुळे यांना सत्तेची पदे दिली नाही. मात्र, प्रफुल्ल पटेल पराभूत होऊनही दहा वर्षे मंत्रीपद व राज्यसभेत त्यांना घेतले. त्यामुळे पटेलांनी उपस्थित केलेला प्रश्न चुकीचा आहे. माझ्या अध्यक्षपदाचा प्रस्ताव प्रफुल्ल पटेल यांनी मांडला होता. मग दिल्लीत झालेली बैठक बेकायदेशीर कशी, असा सवाल शरद पवार यांनी केला.

मूळ साधनसामग्री व संपत्तीवर हक्क सांगणे योग्य नाही. सदसद विवेक बुद्धीचा वापर करावा, असेही पवार यांनी सांगितले. पक्षाचे प्रामाणिक राहिलेल्या जितेंद्र आव्हाड व जयंत पाटील यांच्यामुळे पक्ष अधिक मजबूत, मला दोघांचा अभिमान आहे, असेही पवार यांनी यावेळी सांगितले. पक्ष व संघटना उद्ध्वस्त करण्याची भाजपाची (BJP) योजना आहे. संसदीय लोकशाहीत विरोधी पक्ष महत्त्वाचा असतो. विरोधी पक्ष संपण्याचा भाजपा सतत विरोधकांचा आवाज दाबण्याची प्रवृत्ती आहे, त्यामुळे संघर्ष करावा लागेल.

दिल्लीच्या कार्यकारिणी बैठकीत सर्व सदस्य उपस्थित होते. राजकारणाचा चिखल झाला तरी बिया टाकून चांगले उगवता येईल. पक्षातून गेलेल्यांना पुन्हा बोलवणार नाही आता त्या चिमण्या राहिल्या नाहीत, असा टोला शरद पवार यांनी लगावला. देशात 80 टक्के भागात भाजपची सत्ता नाही. देशात खोका संस्कृती आणून लोकसभा हस्तगत करणे हा भाजपाचा कार्यक्रम देशासाठी धोकादाय आहे, असा हल्लाबोल पवारांनी केला.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT