Sharad Pawar Nashik News : 'मी टायर्ड नाही, रिटायर्डही नाही'; पवारांचा अजितदादांना टोला

Sharad Pawar Nashik Tour : मी टायर्ड नाही रिटायर्डही नाही, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवारांना टोला लगावला.
Sharad Pawar Nashik Tour
Sharad Pawar Nashik Toursarkarnama
Published on
Updated on

Sharad Pawar Nashik Press Conference : मी टायर्ड नाही रिटायर्डही नाही, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजित पवारांना टोला लगावला. नाशिकमध्ये पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. तसेच छगन भुजबळांना (Chhagan Bhujbal) आम्हीच येवलाची जागा लढवायला देऊन सेफ केले होते, असेही पवार यांनी सांगितले.

वय होते यात काही वाद नाही. मात्र, तुम्ही प्रकृती चांगली ठेवली तर वय साथ देते. त्यामुळे तो काही प्रश्नच नाही. मोरारजी देसाई हे पंतप्रधान होते तेव्हा त्यांचे वय ८४ वर्षाचे होते. ते ज्या जोमाने काम करायचे तो अनुभव थक्क करणारा होता, असे पवारांनी सांगितले. चांगले काम करायला वय कधीच अडथळा आनत नाही, असेही पवारांनी स्पष्ट केले.

Sharad Pawar Nashik Tour
Sharad Pawar Yeola Meeting : भूजबळांच्या बालेकिल्ल्यात पवारांच्या साथील जुना शिलेदार सरसावला; तर शिवसेनेचे दराडेही रिंगणात

मी रस्त्याने आज येत असताना लोकांचे चेहरे, त्यांचे हावभाव पाहिले. सामान्य लोकांच्या चेहऱ्यांवर जो आत्मविश्वास होता त्यामुळे मला आनंद झाला. भुजबळांचा मुंबईत पराभव झाल्यानंतर आमची इच्छा होती. त्यांची विधानसभेत आवश्यकता होती. त्यानंतर त्यांनी येवल्यातून निवडणूक लढवली. १९८६ मध्ये मी काँग्रेसमधून (Congress) बाहेर पडलो वेगळा पक्ष निवडला होता. तेव्हा नाशिक जिल्ह्याने आम्हाला साथ दिली होती.

जनार्दन पाटील येवल्यातून दोनदा निवडून आले होते. मारोतराव पवारही एकदा निवडून आले होते. त्यामुळेच आम्ही येवल्याची सेफ जागा भुजबळांना दिली. त्यावेळी तशी चर्चा झाली व तो निर्णय घेतला.

Sharad Pawar Nashik Tour
Jitendra Ahwad to Ajit Pawar: आव्हाडांची अजितदादांना भावनिक साद ; '...पण तुम्ही परत या...

माझी भूमिका मांडण्याची सुरुवात करण्यासाठी मी बाहेर पडलो. मी इथे येत असताना आम्हाला सगळ्यांना म्हणजे मी, जितेंद्र आव्हाड, अमोल कोल्हे (Amol Kolhe), सुप्रिया आम्हा सगळ्यांचे लोकांनी स्वागत केले आहे. आनंद हा आहे की वरुणराजाने स्वागत केले. नाशिक जिल्ह्यात मी आत्ताच विचारत होतो, की पावसाची स्थिती काय? मला हे सांगण्यात आले की रिमझिम पाऊस आहे. मात्र, पुरेसा पाऊस झालेला नाही, असेही यावेळी पवारांनी सांगितले.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com