Amalner Politics : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार हे महाराष्ट्राचा कोपरा न कोपरा फिरले आहेत. अमळनेर येथे तब्बल चौदा वर्षानंतर आले असता. त्यांना आपण एके काळी अमळनेर बाजारात प्रसिध्द जाफराबादी म्हशी खरेदी करण्यासाठी जावा मोटारसायकलवर आल्याची आठवण झाली.
शरद पवार (Sharad Pawar) यांचा राज्याचा दौरा गेल्या अनेक वर्षापासून बहुतांश मोटारीने, रेल्वेने असतो. त्यामुळे जनतेशी संपर्क होतो असे त्यांचे म्हणणे आहे. अमळनेर येथे राष्ट्रवादी ग्रंथालय संघाच्या अधिवेशनास ते उपस्थित राहिले. आताही ते जळगाव दौऱ्यावर रेल्वेने आले आणि अमळनेर येथे मोटारीने गेले.आणि रात्री मुंबईला रेल्वेनेच रवाना झाला.
महाराष्ट्रातील प्रत्येक गावाशी त्यांचा संपर्क आहे, त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या गावाशी तसेच त्या जिल्ह्याशी जुन्या आठवणीत अगदी रममान होतात. जळगाव दौऱ्यावर असतांना जिल्ह्यातील नेत्याशी चर्चा करीत असतांना काही जुन्या आठवणी सांगितल्या, ते म्हणाले, कि जळगावशी आपले स्नेह संबध जुने आहेत. कॉंग्रेसचे काम करीत असतांना काँग्रेसचे (Congress) सभासद करण्यासाठी जळगाव जिल्ह्यात आलो होतो, त्यावेळी पाच रूपयांची पावती फाडून सभासद केले जात असत.
बोदवड येथे गेल्यानंतर त्या ठिकाणी रात्रीआपण जिनींग प्रेस मध्ये झोपल्याची आठवण त्यांनी सांगितली.चार दिवस आपण जिल्ह्यात होतो त्यावेळी आपणास चारही दिवस भरीत भाकरीचा आस्वाद घेतला. या ठिकाणचे लोक प्रेमळ असल्याचा आवर्जून उल्लेख त्यांनी केला. जिल्हयातील नेते के.एम.बापू पाटील, प्रल्हादराव पाटील, मु.ग.पवार, के.डी.आबा पाटील, ब्रिजलालभाऊ पाटील, शरदअण्णा पाटील यांच्यासोबतच्या आठवणीही त्यांनी सांगितल्या.
त्याच वेळी आमदार अनिल पाटील यांनी अमळनेर येथे आपण म्हशी खरेदी करण्यासाठी आल्याचे माहिती मिळाल्याचे सांगितले, त्याला होकार देत ते म्हणाले, अमळनेर येथे बाजारात जाफराबादी म्हशी घेण्यासाठी जावा मोटासायकलवर आलो होतो अशी आठवण सांगितली. पक्षाचे जुने कार्यकर्ते सुपडू भादू पाटील यांची आठवणही सांगितले, त्यावेळी रविद्रंभैय्या पाटील यांनी ते सामनेर येथील शेतकी संघाचे बराच वर्षे अध्यक्ष राहिल्याचे सांगितले.या आठवणीच्या चर्चेची माहीती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्र पाटील यांनी दिली. जळगाव ते अमळनेर प्रवासात त्यांच्या समवेत आमदार एकनाथराव खडसे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, आमदार अनिल भाईदास पाटील होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.