Congress Best District President : मुंबई येथील टिळक भवन येथे शनिवारी (ता. १७) महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या राज्य कार्यकारिणी बैठकी झाली. यावेळी पक्षात उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. यात राज्यात सर्वोत्कृष्ठ जिल्हाध्यक्ष म्हणून नाशिकचे स्वप्निल पाटील यांचा सन्मान करण्यात आला.
स्वप्निल पाटील हे नाशिक (Nashik) शहर व ग्रामीण जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. दोन वर्षांत केलेल्या विविध कामांची, मोहिमांची दखल घेत स्वप्निल पाटील यांना सर्वोत्कृष्ठ जिल्हाध्यक्ष या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्वप्निल पाटील यांनी हा पुरस्कार नाशिक मध्य अध्यक्ष जयेश सोनवणे, पूर्व अध्यक्ष जावेद पठाण, सिडको अध्यक्ष इम्रान अन्सारी, अदनान पटकरी यांच्या समवेत स्वीकारला. (Latest Marathi News)
प्रदेश काँग्रेस समितीने (Congress) राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या अध्यक्षांच्या कामगिरीचा आढावा घेतला होता. यात सर्वात सरस अशी कामगिरी स्वप्निल पाटील यांच्या नावावर नोंदली गेली. पाटील यांनी सर्वात जास्त आंदोलने, मोर्चे, युवा संवाद मेळावे घेतले. यासह संघटनात्मक बांधणी करण्याच्या दृष्टीने तरुणांना, ज्येष्ठांना, महिला, सर्व क्षेत्रातील, समाजातील घटकांसाठी कार्यक्रम राबवले. बूथ पातळीपर्यंत कार्यकर्त्यांचे संघटन करण्यासाठी पाटील यांचे योगदान आहे. स्वप्निल पाटील यांनी भारत जोडो यात्रेतही राहुल गांधी यांच्या बरोबर पूर्ण महाराष्ट्रात सहभाग घेतला होता. या मुद्द्यांवर त्यांना आज पुरस्कार देण्यात आल्याचे काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले.
यावेळी अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास, राष्ट्रीय युवक काँग्रेसचे प्रभारी कृष्णा अलेवरू, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), विधीमंडळ गटनेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत, महाराष्ट्राचे प्रभारी उदय चीब, माजी प्रभारी मितेंद्र सिंह, प्रदेश युवक उपाध्यक्ष शिवराज मोरे, प्रशांत ओगले, शरण पाटील, राष्ट्रीय सचिव आतिषा पैठणकर उपस्थित होते.
यावेळी स्वप्निल पाटील (Swapnil Patil) म्हणाले,"हा पुरस्कार मिळाल्याने मनस्वी आनंद आहे. मी केलेल्या संघटनात्मक काम, युवक, ज्येष्ठ, महिला, सर्व समाजातील, विभागातील लोकांची बांधलेली मोट, भारत जोडो यात्रेत केलेली कामगिरी, सर्वात जास्त आंदोलन, मोर्चे, युवा संवाद मेळावे, बूथ पातळीवर नियोजित कामामुळे हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे. यात माझ्या सहकाऱ्यांचे मोलाचे योगदान आहे. यापुढेही सर्वांना बरोबर घेऊन पक्षाचे काम करणार आहे."
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.