Sharad Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sharad Pawar News : सरोज अहिरेंना टक्कर देणारे शरद पवारांचे ‘ते’ दोन उमेदवार कोण?

Sharad Pawar will lead the Mahavikas Aghadi Front in Devlali Constituency-देवळाली मतदारसंघात महाविकास आघाडीचे नेतृत्व असणार शरद पवारांकडे...

Sampat Devgire

NCP Nashik News : महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यावर निर्माण झालेल्या राजकीय स्थितीत देवळाली मतदारसंघाचे राजकारण वेगळ्याच वळणावर पोहोचले आहे. येथे पारंपरिक शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्षांसाठी शरद पवार सांगतील ते धोरण असणार आहे. (NCP may play a new social engineering politics in Devlali Constituency)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) आमदार सरोज आहेर (Saroj Ahire) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची मानसकन्या असा प्रचार करीत अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत भाजपशी सख्य केले आहे. त्यामुळे आमदार अहिरे सध्या शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या रडारवर आहेत.

काही दिवसांपूर्वीच सत्ता स्थापनेत घडलेल्या विद्यमानांच्या राजकीय बंडानंतर देवळाली मतदारसंघात शरद पवार गट सुप्तावस्थेत सक्रिय झाला आहे. शरद पवार यांच्याशी निष्ठा असलेल्या कार्यकर्त्यांची एक फौज सध्या विश्वासू, निष्ठावान उमेदवाराचा शोध घेत आहेत. देवळाली मतदारसंघात शरद पवार यांना बळ देण्यासाठी सुप्तास्थेत कार्यकर्ते कार्यरत झालेले आहेत.

काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे माजी आमदार योगेश घोलप यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली होती. ते शिवसेनेचे (ठाकरे गट) संभाव्य उमेदवार आहेत. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीदेखील पसंती असल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष्मण मंडाले यांनादेखील मतदारसंघात उमेदवार म्हणूनच इंट्रोड्यूस केलेले आहे.

आमदार सरोज अहिरे यांना पर्याय नाही, या अहिरे समर्थकांच्या प्रचाराला उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीच्या एका गटाकडून घोलप तर जिल्हा अध्यक्षांकडून मंडाले असे दोन उमेदवार पुढे आले आहेत.

या मतदारसंघात मराठा समाजाचा मोठा दबदबा आहे. देवळाली मतदारसंघातील ७३ गावांमध्ये काही प्रमुख व्यक्ती सध्या शरद पवार यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी पुन्हा निष्ठावान उमेदवार पारखत आहेत.

यासाठी विद्यमान इच्छुक असणारे सर्वच उमेदवार मतदारसंघ पिंजून काढण्यावर भर देत आहेत. मतदारसंघातील लोकांची कनेक्टिव्हिटी, नातेगोते, मित्रपरिवार यातून नेहमीच उमेदवारांचे ब्रँडिंग होत असते. लोकसभेच्या दृष्टीने परिवर्तन घडवणारा मतदारसंघ म्हणून देवळाली ओळखला जातो. त्यामुळे लोकसभेआधीच देवळाली मतदारसंघात राष्ट्रवादीकडून विधानसभेची तयारी सुरू झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT