BJP Election News : नाशिक मतदारसंघातून खासदार गोडसे उमेदवारीसाठी निश्चित?

Eknath Sinde Group confident about Nashik constituency-नाशिकमध्ये भाजपकडून लोकसभेबरोबरच विधानसभेसाठी नेमले प्रभारी...
Hemant Godse & Dinkar Patil
Hemant Godse & Dinkar PatilSarkarnama
Published on
Updated on

Nashik BJP-Shinde Group Politics : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपचे खासदार असलेल्या दिंडोरीपेक्षा नाशिक मतदारसंघाच्या तयारीसाठी दौरा केला. पदाधिकारीही जोमाने कामाला लागले आहेत. मात्र, आजच्या घडीला भाजपची आघाडी असल्याने ही सर्व तयारी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्यासाठीच सुरू असल्याचे चित्र आहे. (BJP is busy with strong prepration for Loksabha election)

नाशिक (Nashik) लोकसभा मतदारसंघाबरोबरच भाजपने (BJP) विधानसभा निवडणुकीची तयारीदेखील सुरू केली आहे. या मतदारसंघात विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) हे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे आहेत. त्यामुळे या सर्व तयारीचा लाभ उमेदवार म्हणून गोडसे यांना मिळेल का?

Hemant Godse & Dinkar Patil
Chhagan Bhujbal News : भांडण कसले? अजित पवार हे तर माझे भाऊ!

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकताच नाशिकचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांचा सर्व भर लोकसभा निवडणुकीच्या तयारीवर होता. त्यांनी दोन टप्प्यात सर्व सहा विधानसभा मतदारसंघांतील सहाशे बूथप्रमुखांचा मेळावा घेऊन निवडणूक तयारीचा संदेश दिला.

आगामी लोकसभेला महाराष्ट्रातील ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याचे भाजपचे लक्ष्य आहे. त्यासाठी त्यांनी विरोधी पक्षांचे खासदार असलेले मतदारसंघ आपल्या रडारवर घेतले आहेत. लोकसभेबरोबरच विधानसभेचीही जोरदार तयारी सुरू केली असून, त्याचाच एक भाग म्हणून निवडणूक प्रचार प्रमुख गिरीश पालवे यांसह विधानसभा मतदारसंघांचे प्रमुखदेखील नियुक्त केले.

नाशिक लोकसभा मतदारसंघातील नाशिक पश्चिम- राजेश दराडे, नाशिक मध्य- अनिल भालेराव, नाशिक पूर्व- सुनील केदार, सिन्नर- जयंत आव्हाड, देवळाली- तनुजा घोलप आणि इगतपुरी- सीमा झोले यांचा समावेश आहे. पुढच्या टप्प्यात हे प्रमुख कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणावर भर देणार आहे. त्यामुळे भाजपने सुरू केलेल्या या जोरदार तयारीचा लाभ विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना मिळणार की, भाजपचे प्रबळ दावेदार दिनकर पाटील यांसह इतर उमेदवारांना मिळणार याची उत्सुकता आहे.

Hemant Godse & Dinkar Patil
Nanded NCP Politics : आधीच परिस्थिती बिकट, त्यात राष्ट्रवादीवर पक्षफुटीचा आघात...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com