Sharad Pawar & Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

NCP Sabha In Yeola: शरद पवारांचे भुजबळांना थेट आव्हान, ८ ला येवल्यात सभा!

Rashtrawadi Sabha In Yeola: छगन भुजबळांच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांचा ८ तारखेला एल्गार, राज्यातील पहिली सभा येवल्यात होणार

Sampat Devgire

Sharad Pawar News : छगन भुजबळ यांना येवला मतदारसंघातून आमदार करणारे शरद पवार होते. आता भुजबळ यांनी पक्षात फूटपडल्यावर अजित पवार यांची साथ केली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी राज्याचा दौरा करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांची पहिली सभा येत्या शनिवारी (ता.८) थेट छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात होणार आहे. (Sharad Pawar will give challange to Chhagan Bhujbal from Yeola)

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर शरद पवार (Sarad Pawar) आहे. हा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा मतदारसंघ आहे. त्यामुळे श्री. पवार थेट भुजबळ यांना आव्हान देणार असल्याने यावेळी भुजबळ विरोधक एकवटण्याची चिन्हे आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे अतिशय विश्वासू, येथील आमदार भुजबळ यांनीच बंड करत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या गटात सहभागी झाले. त्यामुळे शरद पवार यांनी आता भुजबळ यांच्या तदारसंघातूनच पक्ष बांधणीचा एल्गार पुकारला आहे.

यापूर्वी प्रत्येक वेळेस शरद पवारांनी भुजबळ यांची बाजू घेत पक्षात त्यांना साथ दिली, तरीही ते पवारांना सोडून गेल्याने भुजबळांचे येथील विरोधक व ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांनी आज सिल्वर ओक येथे शरद पवारांची भेट घेतली. शिंदे व पवारांचे अतिशय जुने नाते आहे, किंबहुना पवारांनी राज्य कापूस पणन महासंघाचे अध्यक्षपद देखील शिंदे यांच्या पत्नी उषाताई शिंदे यांना दिले होते. हे जुने नाते वृद्धिंगत करत आज शिंदे यांनी जाहीर पाठिंबा देऊन मुंबईत पवारांची भेट घेतली.

यावेळी आठ तारखेला दुपारी तीन वाजता येवल्यात सभा घेण्याचे पवार यांनी मान्य केल्याची माहिती शिंदे यांनी दिली. या सभेला विशेष महत्त्व आहे. कारण अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पाडल्यानंतर श्री. पवार यांनी राज्यभर दौरा करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर त्यांची येवला व जळगावला मुक्ताईनगर येथे शनिवारी दौरा जाहीर केला आहे. नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात या सभेला विशेष महत्व आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT