CM Eknath Shinde News : राष्ट्रपतींचे स्वागत करून मुख्यमंत्री तातडीने गेले मुंबईला, पुन्हा राजकीय भूकंप होणार?

NCP : राष्ट्रवादी काँग्रेसचे चाळीस आमदार सत्तेत सहभागी झाले होते.
Eknath Shinde, Devendra Fadanvis and Others
Eknath Shinde, Devendra Fadanvis and OthersSarkarnama
Published on: 
Updated on: 

The Chief Minister immediately went to Mumbai : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे काल नागपुरात आगमन झाले. राजभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. नियोजित कार्यक्रमानुसार मुख्यमंत्री तीन दिवसांच्या दौऱ्यावर आले होते. पण काल (ता. ४) राष्ट्रपतींचे स्वागत केल्यानंतर ते तातडीने मुंबईला परत गेले. (Forty MLAs of NCP were involved in Government)

मुख्यमंत्र्यांच्या परतीचे कारण अद्याप समजले नसले तरी राज्याच्या राजकारणात आणखी एक भूकंप होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. रविवारी (ता. २) अचानक अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे चाळीस आमदार सत्तेत सहभागी झाले होते.

अजित पवार यांना उपमुख्यमंत्री तर राष्ट्रवादीच्या आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तेव्हापासून शिवसेनेत मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मोठा असंतोष उफाळून आल्याने नवनियुक्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रपतींच्या कार्यक्रमासाठी नागपूरला येण्याचे टाळले.

आज (ता. ५) शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईत सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री शिंदे सेनेच्या बंडाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाने अपात्र ठरवण्याचा निर्णय विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवला आहे. याकरिता तीन महिन्यांची मुदत दिली आहे. आता दीड महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे.

Eknath Shinde, Devendra Fadanvis and Others
DCM Ajit Pawar यांनी स्पष्टच सांगितलं | NCP Split | Shivsena | CM Eknath Shinde | Sarkarnama Video

सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना नियमांची चौकट आखून दिली आहे. त्याचे विश्लेषण करताना कुठल्याही परिस्थितीत बंडखोर शिवसेनेच्या आमदारांना अपात्र घोषित करावेच लागणार असल्याचा दावा विरोधकांमार्फत केला जात आहे.

शिंदे आणि त्यांचे सहकारी आमदार अपात्र ठरल्यास अजित पवार (Ajit Pawar) राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकतात, अशी शक्यता वर्तविली जात आहे. याचीच जोरदार चर्चा सध्या राज्याच्या राजधानीत (Mumbai) आणि उपराजधानीतही (Nagpur) सुरू आहे. मुख्यमंत्री शिंदे तातडीने आल्यापावली नागपूर सोडून मुंबईला गेल्याने या चर्चेने अधिक वेग धरला आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.