Shasan Aplya Dari Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shasan Aplya Dari: डोळ्यांच्या साथीमुळे आरोग्य विभाग म्हणते गर्दी टाळा; दुसरीकडे 'शासन आपल्या दारी' कार्यक्रम जोरात

Shinde-Fadnavis-Pawar government : शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा शिर्डीत येत्या 11 ऑगस्ट रोजी "शासन आपल्या दारी" हा कार्यक्रम होणार

सरकारनामा ब्यूरो

राजेंद्र त्रिमुखे :

Ahmednagar News : शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा शिर्डीत येत्या 11 ऑगस्ट रोजी "शासन आपल्या दारी" हा कार्यक्रम होणार असून शासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांतर्गत जवळपास 25 लाख लाभार्त्यांना योजनांचा लाभ मिळणार असल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. सध्या डोळ्यांची साथ असली तरी यासाठी काळजी घेऊन कार्यक्रम पार पाडला जाईल, अशी ग्वाही विखे पाटील यांनी दिली.

तत्पूर्वी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेत पालकमंत्र्यांनी शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी आमदार संग्राम जगताप, माजी आमदार वैभव पिचड, बाळासाहेब मुरकुटे, जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, जिल्हापरिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, मनपा आयुक्त पंकज जावळे उपस्थित होते.

'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. कार्यक्रमास जवळपास 30 हजार लाभार्थी प्रत्यक्ष उपस्थित राहणार असून त्यांच्या येण्या-जाण्याची व्यवस्था एसटी बसच्या माध्यमातून केली जाणार असल्याचे विखे म्हणाले.

सध्या राज्यभरात डोळे येण्याची साथ आली असून या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने गर्दीचे कार्यक्रम टाळण्याचे आवाहन केले आहे. 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाच्या निमित्ताने 25 ते 30 हजार लाभार्थी येणार असल्याने शासनाच्या आरोग्य विभागाचे गर्दीचे कार्यक्रम टाळण्याच्या आवाहनाचे काय? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. यावर बोलताना विखे पाटील यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी याबाबत योग्य त्या उपाययोजना केल्या जातील, अधिकची काळजी घेतली जाईल, असे आश्वासीत केले.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT