Supriya Sule In Parliament : मोदी सरकारने नऊ वर्षात नऊ सरकार पाडली; सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्लाबोल

Supriya Sule On Modi Govt: संसदेत सत्ताधारी-विरोधक चांगलेच भिडल्याचे चित्र पाहायला मिळाले.
Supriya Sule
Supriya Sule sarkarnama
Published on
Updated on

Delhi News: मणिपूरमधील हिंसाचारावरून मोदी सरकारविरोधात आलेल्या अविश्वास प्रस्तावावर भाषणे ठोकून विरोधकांनी संसद दणाणून सोडली. काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांच्यापासून खासदार सुप्रिया सुळे, अरविंद सावंत या सर्वांनी मोदी-शाहांच्या कारभाराचे लक्तरे काढली. त्यावर भाजपच्या खासदारांनीही विरोधकांचे हल्ले त्यांच्याच भाषेत परतावून लावले.

परिणामी संसदेत सत्ताधारी-विरोधक चांगलेच भिडल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपची कोंडी करत प्रश्नांची सरबत्ती केली. त्याचवेळी मंत्री आणि सत्ताधारी पक्षाची भाषा ही हे सरकार अत्यंत अहंकारी असल्याचे दिसत आहे, असा घणाघात सुळेंनी मोदी सरकारवर केला.

Supriya Sule
MP Omraje Nimbalkar News: अखंडपणे केलेली कामे हीच माझी शिदोरी ; ओमराजे लागले निवडणुकीच्या तयारीला..

विरोधकांनी मणिपूरमधील हिंसाचारावरून लोकसभेत आणलेल्या अविश्वास प्रस्तासंदर्भात सभागृहात चर्चा झाली. यावर सत्ताधारी खासदारांनीही आपली भूमिका मांडली. यामध्ये अमरावतीच्या खासदार नवणीत राणा या देखील विरोधकांना भिडल्याचे पाहायला मिळाल्या. तर दुसरीकडे मोदी सरकारने गेल्या नऊ वर्षांत नऊ सरकारं पाडली आहेत, असा शब्दात सुप्रिया सुळे यांनी सरकारला सुनावले.

अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, कर्नाटक, गोवा, मध्यप्रदेश आणि पुडुचेरी या राज्यातील सरकारं पाडल्याचे सांगून सरकारवर घणाघात केला. तसेच मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी करत मणिपूरच्या परिस्थितीमध्ये सरकार इतके असंवेदनशील कसे वागू शकते, असा सवाल देखील त्यांनी सरकारला विचारला.

Supriya Sule
Shivsena MLA Disqualification Case: शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील सुनावणी पुन्हा घेणार वेग

"वास्तविकतेला धरून कुठलाच सत्ताधारी नेता बोलत नाही. पुढेही आमचेच सरकार येणार आहे. विरोधक संपणार आहेत, अशी टीका सत्ताधारी पक्ष करत आहेत. विरोधक उरलेच नाही, असे बोलत आहेत. मग ही लोकशाही आहे का?", असा सवाल देखील सुप्रिया सुळे यांनी केला.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com