Shivsena Political News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shivsena Political News : शिंदे गटाच्या नेत्याची ठाकरेंना मोठी विनंती ; म्हणाले,'' संजय राऊतांना बाजूला करा, पुन्हा...''

Shinde Vs Thackeray Group News : '' बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी राऊत यांनी केली आहे. मात्र...''

सरकारनामा ब्यूरो

Nashik News : ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते म्हणून संजय राऊत ओळखले जातात. ठाकरे गटाची बाजू भक्कमपणे मांडण्यात आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल करण्यात ते नेहमीच आघाडीवर असतात. मात्र, कधी कधी राऊत त्यांच्या विधानांमुळे स्वत: सह पक्षालाही अडचणीत आणतात. तसेच शिवसेनेतील उभ्या फुटीला राऊतच कारणीभूत असल्याचा आरोपही शिंदे गटाकडून केला जातो. याचवेळी शिंदे गटातील नेत्याकडून शिवसेना ( ठाकरे गट) पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंकडे मोठी विनंती केली आहे. यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

शिवसेना (शिंदे गट) नाशिक जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संजय राऊतां( Sanjaya Raut) वर टीकेची झोड उठवली आहे. या टीकेला ठाकरे गटाचे महानगर सुधाकर बडगुजर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या दिवशीच नाशिकमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट आमने सामने आल्याचं पाहायला मिळत आहे.

शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त नाशिकमध्ये जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला आहे. यावेळी बोरस्ते म्हणाले, "बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 मध्ये शिवसेने(Shivsena) ची स्थापना केली. हा स्थापना दिवस आमच्या शिवसैनिकांसाठी कमी नाही. मात्र, काही काळापासून शिवसेना ही काँग्रेस, राष्ट्रवादीच्या दावणीला बांधलेली होती. त्यामुळे शिवसैनिक नाराज होता. हा शिवसैनिक आयुष्यभर यांच्याशी भांडला. त्यांच्याबरोबर नेते मांडीला मांडी लावून बसत असतील, मात्र, कार्यकर्त्याला हे पसंत नव्हतं असा घणाघातही बोरस्ते यांनी यावेळी ठाकरे गटावर केला.

राऊतांबाबत बोरस्ते काय म्हणाले..?

शिंदे गटाचे नेते व जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. यावेळी बोरस्ते म्हणाले, 'बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी राऊत यांनी केली आहे. मात्र, आम्ही उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना विनंती करतो की, संजय राऊत यांना बाजूला करा, पुन्हा एकदा तीच शिवसेना तुम्हाला दिसेल असंही बोरस्ते म्हणाले.

एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी बाळासाहेबांना अपेक्षित असलेली शिवसेना उभी केली आहे. यावर निवडणूक आयोगाने देखील शिक्कामोर्तब केला आहे. शिल्लक सेनेतील जे काही राहिले असेल ते देखील लवकरच शिवसेनेत येतील असेही बोरस्ते म्हणाले. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जाऊन एकनाथ शिंदे काम करत असून ते जनतेला पटत आहे, असा मुख्यमंत्री कोणी बघितला नाही. याचा आम्हाला अभिमान असल्याचंही ते यावेळी म्हणाले.

ठाकरे गटाचं प्रत्युत्तर...

शिंदे गटाच्या टीकेला ठाकरे गटाकडून जोरदार पलटवार करण्यात आला आहे. यावेळी ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी शिंदे गटावर बोचरी टीका केली आहे. बडगुजर म्हणाले, संजय राऊत हे ढाण्या वाघ आहेत. तुमच्यासारखे भागूबाई नाही. अडचणीच्या काळात उद्धव ठाकरे यांच्या पाठीत तुम्ही खंजीर खुपसला आहे असंही ते यावेळी म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT