Darshana Pawar Death Case: दर्शनाचा खून झाल्याचा संशय;मित्र हंडोरे बेपत्ता, पोलीस मागावर

राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात तिसरी आलेल्या २६ वर्षीय दर्शना पवारचा संशंयास्पद मृत्यू झाला.
Darshna Pawar Death Case:
Darshna Pawar Death Case: Sarkarnama
Published on
Updated on

Darshana Pawar Death Case : राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात सहावी आलेल्या २६ वर्षीय दर्शना पवारचा संशंयास्पद मृत्यू झाला. वेल्हे तालुक्यातील राजगडाच्या पायथ्याशी तिची मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली होती. रविवारी (१८ जून) रोजी तिचा मृतदेह सापडल्यानंतर त्याचे पोस्टमॉर्टेम करण्यात आले.पोस्टमॉर्टेम अहवालातून काही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पोस्टमॉर्टेम अहवालानुसार दर्शना पवारच्या डोक्यावर आणि शरीरावर जखमा आढळल्या आहे. (Crime News) तिच्या डोक्याला आणि शरीराला जबर मारहाण झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले आहे.पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी दर्शनाच्या मित्र मात्र अद्यापही बेपत्ता आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या तपासासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची पाच पथके तयार करण्यात आली आहेत.

Darshna Pawar Death Case:
Pune Crime News : धक्कादायक! एमपीएसीत सहावी आलेल्या युवतीचा संशयास्पद मृत्यू; राजगडाच्या पायथ्याशी आढळला मृतदेह

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ जून रोजी दर्शना पवार पुण्यातील स्पॉट लाईट ॲकॅडमी येथे आली होती. ११ जून सायंकाळी चार वाजेपर्यंत ती घराच्यांच्याही संपर्कात होती. पण १२ रोजी दर्शनाने घरातील एकाही व्यक्तीचा फोन उचलला नाही की स्वत:हून कोणाला कॉलही केले नाहीत. (Pune Police) दुसऱ्या दिवशी तिच्या कुटुंबियांनी पुण्यात येऊन स्पॉट लाईट ॲकॅडमीकडे चौकशी केली. त्यावेळी दर्शना ही तिचा मित्र राहुल हांडोरे याच्यासोबत सिंहगड आणि राजगड याठिकाणी फिरण्यासाठी गेली असल्याची माहिती त्यांना मिळाली. पण तरीही हे दोघे कोणाच्याच संपर्कात नव्हते.

दर्शनाच्या कुटुंबियांनी सिंहगड पोलीस ठाण्यात दर्शना बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. तपासादरम्यान, राजगडाच्या पायथ्याशी १८ जूनला दर्शनाचा अर्धवट कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. पण तिच्यासोबत असलेला हांडोरे मात्र अद्यापही बेपत्ता आहे. हांडोरे याच्या शोधासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची पथके रवाना झाली आहे. (Maharashtra News)

राजगडावर मिळालेल्या सीसीटिव्ही फुटेजनुसार, 12 जूनला 8 वाजून 15 मिनिटांच्या सुमारास दर्शना आणि राहुल दोघेही गड चढायला सुरुवात केली. जाताना दोघेही सोबत दिसत आहेत. पण 10 वाजण्याच्या सुमारास राहुल एकटाच खाली परतला. त्यानंतर तेव्हापासून तोही बेपत्ता आहे? राहुलला शोधण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची पाच पथके तयार करण्यात आली आहेत.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com