Jayant Patil Welcome by Ncp leaders. Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

आमदार सांगतात, `कुठून अवदसा आठवली, या नादाला लागलो`

एकनाथ शिंदे गटात गेलेल्या सर्व ४० आमदारांना मंत्री व्हायचे आहे

Sampat Devgire

नाशिक : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात गेलेल्या सर्व ४० आमदारांना मंत्री (All 40 MLAs wants to be minister) व्हायचे आहे, तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) उपमुख्यमंत्री झाल्याने भाजपचे (BJP) १०५ आमदार नाराज आहेत. शिंदे गटासोबत गेलेले काही आमदार खासगीत सांगतात की, `कुठून अवदसा आठवली, या नादाला लागलो`असे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सांगितले. (All 40 mlas wants to be ministers)

श्री. पाटील यांच्या उपस्थितीत शहर आणि जिल्हा संघटनेची बैठक आज राष्ट्रवादी भवनात झाली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

ते म्हणाले, बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव होणार नाही, हे भारतीय जनता पक्षाला माहिती आहे. पण प्रचारासाठी हवा तयार केली जात आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बारामतीचा आदर्श विकास पाहण्यासाठी आल्या होत्या, असेही पाटील यावेळी म्हणाले.

प्रत्येकाला आपल्या मतदारसंघात काही चांगले काम करावे असे वाटते. मात्र काय करायचे हे कळत नाही. त्यामुळे केंद्रीय निर्मला सीतारामन यांचा छुपा अजेंडा आहे. एक ते दोनदा भेटी देतील आणि नंतर विकास पाहण्यासाठी हळूच जातील, असा टोला श्री. पाटील यांनी लगावला. शिवाय चप्पल, कपडे, अन्नधान्यावर जीएसटी का लावला हा प्रश्‍न जनतेला विचारण्याची संधी मिळाली आहे, असेही सांगायला ते विसरलेले नाहीत.

शक्य तिथे आघाडीचा प्रयत्न

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाशिकमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत ‘एकला चलो रे‘ हा नारा दिला. त्याअनुषंगाने श्री. पाटील म्हणाले, की आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतो, असे सर्व पक्षांचे नेते म्हणतात. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसने एकत्र यावे यासाठी प्रयत्न असेल. शिवाय शक्य तिथे आघाडी करणार आहोत. त्यासाठी स्थानिक पातळीवर अधिकार देण्यात आले आहेत. अधिक समन्वय साधण्यात येणार आहे.

दिल्लीश्‍वरांची नाराजी टाळली जातेय

वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गेला याची पूर्ण जबाबदारी शिंदे सरकारची आहे. अगोदरच्या उद्योगमंत्र्यांनी सवलती दिल्या होत्या. तळेगावला प्रकल्प होणार होता. पण प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यावर राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांना भेटले का? असा प्रश्‍न उपस्थित करून श्री. पाटील यांनी दिल्लीश्‍वरांची नाराजी होईल म्हणून श्री. अग्रवाल यांना भेटायला घाबरत आहेत, असे टीकास्त्र सोडले. तसेच भारतीय जनता पक्षाला आमदारांची संख्या १०५ वरून ८० वर येईल, अशी भीती वाटत असल्याची टीका करत श्री. पाटील यांनी भारतीय जनता पक्ष २०० आमदार संख्या गाठणार नाही, असा दावा ठोकला. राज्यातील सत्तांतरामुळे जनतेत मोठी नाराजी असल्याचे त्यांनी सांगितले.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT