एकनाथ शिंदे अन् त्यांनी फोडलेल्या नगरसेवकांचा फैसला एकाच दिवशी?

जळगाव महापालिकेच्या नगरसेवक अपात्रेप्रकरणी विभागीय आयुक्तांकडे २७ ला निकाल.
Eknath Shinde & Jalgaon Corporation Building
Eknath Shinde & Jalgaon Corporation BuildingSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेविरोधात (Shivsena) बंड केले. पक्षाचे चाळीस आमदार (MLA) फोडले. त्याआधी त्यांनी जळगावला भाजपचा (BJP) सत्ता खालसा करीत त्यांचे नगरसेवक फोडले होते. आता मुख्यमंत्री शिंदे आणि जळगावचे नगरसेवक दोघांच्या अपात्रतेचा (Disqualification)फैसला एकाच दिवशी २७ सप्टेबरला होण्याची शक्यता आहे. (SC & revenue commissioner hearing on the same day about disqualification)

Eknath Shinde & Jalgaon Corporation Building
Shivsena: शिंदे गटात गेलेल्या तिदमेंची परतण्याआधीच हाकालपट्टी!

मुख्यमंत्री शिंदे यांसह सोळा आमदारांनी शिवसेनेचा व्हीप झुगारल्याने त्यांच्या अपात्रतेबाबत शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी सातत्याने पुढे सरकत आली आहे. पुर्ण पीठापुढे त्याची सुनावणी आता २७ सप्टेबरला आहे. त्याचबरोबर शिंदे यांनी जळगाव महापालिकेत भाजपचे नगरसेवक फोडून शिवसेनेच्या जयश्री महाजन यांना महापौर केले होते. त्या फुटलेल्या भाजपच्या नगरसेवकांच्या पात्रतेची सुनावणी देखील योगायोगाने त्याच दिवशी आहे. या दोन्ही निकालांकडे सगळ्यांचेच लक्ष लागून आहे. या निकालावर राज्यातील सत्ता समिकरणे बदलणार आहेत.

Eknath Shinde & Jalgaon Corporation Building
NCP News: भामरेंकडून भातकळकरांची खिल्ली, त्यांच्या मेंदूचा खळ झाला आहे!

भारतीय जनता पक्षातून फुटलेल्या २७ नगरसेवकांच्या अपात्रेबाबत मंगळवार (ता. २७) निकाल जाहीर होणार असून, विभागीय आयुक्तांनी सर्व नगरसेवकांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

जळगाव महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे ५७ नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे महापालिकेवर भाजपची सत्ता होती. अडीच वर्षे भारतीय जनता पक्षाचा महापौर होता. मात्र, शासनाच्या नियमाप्राणे अडीच वर्षांनंतर पुन्हा महापौर व उपमहापौरपदासाठी निवडणूक झाली. त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे तब्बल २७ नगरसेवक फुटले. त्यांनी शिवसेनेच्या महापौरपदाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. याच बळावर शिवसेनेच्या जयश्री महाजन महापौरपदी विराजमान झाल्या, तर फुटीर गटातील कुलभूषण पाटील उपमहापौर झाले.

भारतीय जनता पक्षातून फुटलेल्या नगरसेवकांनी पक्षाचा व्हीप डावलून मतदान केले. त्यामुळे त्या २७ नगरसेवकांना अपात्र ठरवावे, अशी मागणीची याचिका भारतीय जनता पक्षातर्फे नाशिक विभागीय आयुक्तांकडे दाखल करण्यात आली. फुटीर गटाचे नेते ॲड. दिलीप पोकळे यांनीही आपलाच गट भारतीय जनता पक्षाचा असून, प्रभाग समिती सभापती निवडणुकीत आमचा व्हीप डावलल्यायामुळे भाजपच्या २७ नगरसेवकांना अपात्र करावे, अशी याचिका नाशिक विभागीय आयुक्ताकडे दाखल केली. या दोन्ही याचिकांवर सुनावणी सुरू असून, भाजप आणि फुटीर गटाच्या गट नेतेपदाबाबत औरंगाबाद खंडपीठात सुनावणी सुरू होती. याबाबत न्यायालयाने नाशिक विभागीय आयुक्तांनी निकाल द्यावा, असे आदेश दिले. त्यामुळे गट नेतेपदाबाबतही नाशिक विभागीय आयुक्तांकडे सुनावणी सुरू आहे.

फुटलेल्या २७ नगरसेवकांच्या अपात्रतेबाबत बुधवारी नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यांनी या प्रकरणी २७ ला पुढील सुनावणी ठेवून अंतिम निकाल देण्याचे जाहीर केले. त्यांनी फुटीर नगरसेवकांना नोटीस बजावली असल्याची माहिती नगरसेवकांनी दिली. या नोटिसीत त्यांनी म्हटले आहे, की सुनावणीला २७ सप्टेबरला ज्यांना आपले म्हणणे सादर करावयाचे आहे. त्यासाठी हजर व्हावे. मात्र, जे हजर राहणार नाहीत, त्यांना काहीही म्हणावयाचे नाही, असे समजून निकाल जाहीर करण्यात येईल. त्यामुळे आता नाशिक विभागीय आयुक्त फुटीर नगरसेवकांबाबत काय निकाल देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com