Sudhakar Badgujar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shivsena: शिवसेनेच्या शक्तीप्रदर्शन, डावपेचांनी शिंदे गटाची सत्ता निष्प्रभ!

Sampat Devgire

नाशिक : शिवसेना (Shivsena) प्रणित म्युनिसिपल कामगार सेनेचे (Municiple workers sena) अध्यक्ष प्रवीण तिदमे (Pravin Tidme) यांनी शिंदे (Shinde Group) गटात प्रवेश केल्याने या पदाबाबत कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. नाशिक महानगरपालिकेच्या (NMC) कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या म्युनिसिपल कामगार सेनेच्या अध्यक्षपदी आता शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. (Sudhakar Badgujar became the president of Municiple workers Sena)

शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रविण तिदमे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतरही म्युनिसिपल कामगार सेनेच्या अध्यक्षपदी कायम असल्याचा दावा केला होता, मात्र हा दावा शिवसेनेचे उपनेते बबन घोलप यांनी फेटाळून लावला आहे.

प्रवीण तिदमे यांच्या जागी आता नाशिक शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या नावाची घोषणा शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्यात बबन घोलप यांनी केली आहे.शिंदे गटात जाणाऱ्या संभाव्य नाराज नगरसेवकांच्या मनधरणीसाठी शिवसेनेच्या वतीने सातपूरच्या सौभाग्य लॉस येथे पदाधिकारी मेळावा घेण्यात आला.

या मेळाव्याला शिवसेना उपनेते बबन घोलप, उप नेते सुनील बागुल, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार वसंत गीते, माजी गटनेते विलास शिंदे, माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, देवा जाधव, प्रेम दशरथ पाटील यांच्यासह शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मिसळ पार्टीचे देखील आयोजन करण्यात आले होते.

सिडकोत कर्मचाऱ्यांचा जल्लोष

शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांची म्युनिसिपल कामगरसेनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने कामगरसेनेच्या सिडकोतील पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला. सुधाकर बडगुजर हे अभ्यासू व मनमिळाऊ तसेच कामगारांच्या प्रश्नांची जाण असलेले व्यक्तिमत्व असल्याने महापालिका कर्मचाऱ्यांना ते निश्चितच न्याय मिळवून देतील,असा विश्वास यावेळी अंबादास विधाते,अजय साळवे,यशवंत लहामगे यांनी व्यक्त केला.

कर्मचाऱ्यांचे प्रलंबित सर्व प्रश्न निकाली काढण्यासाठी आपण प्रयत्न करू. असे आश्वासन सुधाकर बडगुजर यांनी सत्काराला उत्तर देतांना सांगितले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT