Dada Bhuse...आणि पालकमंत्री दादा भुसे काहीच करू शकले नाही?

शिवसेनेला बैठक घेण्यासाठी सकाळी दिलेली परवानगी महापालिकेने दुपारी नाकारली
Sudhakar Badgujar & Dada Bhuse
Sudhakar Badgujar & Dada BhuseSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या (Municiple workers sena) बैठकीसाठी महापालिका मुख्यालयात (NMC headquarter) सकाळी देण्यात आलेली परवानगी दुपारी मात्र नाकारण्यात आल्याने प्रशासनाने अखेर सत्तेला सलाम केल्याचे दिसून आले. पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या सांगण्यावरून महापालिका मुख्यालयातील रेकॉर्ड रूम शिवसेनाप्रणीत (Shivsena) संघटनेला नाकारण्यात आल्याचे बोलले जात आहे. एव्हढे करूनही दादा भुसे निष्ठावंत शिवसेनेपुढे काहीच करू शकले नाही, असे चित्र दिसले. (Shivsena keep there leadership in Nashik Munciple corporation Workers union)

Sudhakar Badgujar & Dada Bhuse
Shivsena: शिंदे गटाच्या प्रविण तिदमे यांना दिलासा; शिवसेनेला धक्का!

राज्यातील सत्तांतरानंतर शिंदे गटाकडून शिवसेना संघटनेलाच आव्हान देण्याचे काम सुरू आहे. नाशिकमधून माजी नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्याचबरोबर त्यांच्याकडे महानगरप्रमुख पद आले. तिदमे हे शिवसेनाप्रणीत नाशिक म्युनिसिपल कर्मचारी कामगार संघटनेचे अध्यक्ष होते. त्यामुळे संस्थापक अध्यक्ष बघून घोलप यांनी तिदमे यांची पदावरून तातडीने हकालपट्टी केली.

Sudhakar Badgujar & Dada Bhuse
मुख्यमंत्री शिंदे यांच्या सूनबाई वृषाली शिंदे राजकीय मैदानात?

त्यानंतर शिवसेना व शिंदे गटात संघटनेवरून वाद निर्माण झाला. त्या वादाचा फैसला मंगळवारी कर्मचाऱ्यांच्या बैठकीतून केला गेला. यावेळी अतिशय वेगाने हालचाली घडल्या. श्री. तिदमे यांनी कामगार सहआयुक्तांकडे संपर्क केला. महिने महिने निर्णय न देणाऱ्या सह आयुक्तांनी लगेचच महापालिका आयुक्तांना श्री. तिदमे अध्यक्ष असल्याचे पत्र दिले. दुसरीकडे महापालिकेने शिवसेनेला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या सगळ्याचा काहीच उपयोग झाला नाही.

शिवसेना भवनमध्ये त्यासाठी बैठक बोलवावी लागली. त्यापूर्वी नाशिक म्युनिसिपल कर्मचारी संघटनेकडून महापालिका मुख्यालयातील रेकॉर्ड रूममध्ये कर्मचाऱ्यांची बैठक बोलाविण्यात आली होती. सकाळी प्रशासनाकडून बैठक घेण्यास मान्यता दिली मात्र दुपारनंतर रेकॉर्ड रूमला टाळे ठोकण्यात आले रेकॉर्ड रूम मध्ये सुरू असलेल्या महिला कर्मचाऱ्यांच्या स्पर्धादेखील आटोपत्या घेण्यात आल्या.

पालकमंत्र्यांचा दबाव?

संघटनेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांची बैठक होणार असल्याने या बैठकीत विघ्न आणण्यासाठी माजी अध्यक्ष तिदमे यांनी प्रयत्न केले. पालकमंत्री दादा भुसे यांच्या माध्यमातून महापालिकेचा रेकॉर्ड रूम मिळू नये, यासाठी दबाव आणला गेल्याचे बोलले जात आहे.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com