Pawan Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Crime : शिंदे सेनेच्या माजी नगरसेवकाकडून वृद्ध महिलेचे अपहरण, धमकी देऊन २० लाख उकळले

Former Shinde Sena Corporator Pawan Pawar: पवन पवार यांच्याविरोधात आधीच दोन गुन्हे दाखल असून पोलिसांच्या त्यांच्या शोधात आहे. अशातच आणखी एक गंभीर गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला आहे.

Ganesh Sonawane

Nashik Politics : नाशिकमधील शिवसेना शिंदे गटाचा नेता व माजी नगरसेवक पवन पवार याच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. पवन पवार विरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात वृद्द महिलेचे अपहरण करुन खंडणी उकळल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पवन पवार विरोधात आधीच दोन गुन्हे दाखल आहेत. त्यात आता हा तिसरा गुन्हा दाखल झाला आहे. 71 वर्षीय वृद्ध महिलेला चाकूचा धाक दाखूवून जबदरस्तीने गाडीत डांबून जीवे मारण्याची धमकी देऊन पतीच्या नावे असलेल्या बँक खात्यातून 20 लाख रुपये काढून घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पवन पवारवर एकापोठापाठ एक गुन्हे दाखल होत असल्याने शिवसेना शिंदे गटाचीही कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

पवन पवार विरोधात तक्रार देण्यात आली आहे त्यानुसार, नवीन सिडको परिसरात राहणारे 71 वर्षीय फिर्यादी वृद्ध महिलेच्या घरी जाऊन संशयित आरोपी पवन पवार, त्याचा भाऊ विशाल पवार, कल्पेश किर्वे यांनी त्यांना धमकावले. चाकूचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर काळ्या रंगाची काच असलेल्या कारमध्ये बळजबरीने डांबून त्यांना बँकेत घेऊन गेले. अंबड येथील बँक शाखेत घेऊन जात तेथे खात्यातून 20 लाख रुपये काढण्यास भाग पाडून ती रक्कम पवार बंधूनी स्वतःच्या ताब्यात घेत हडपल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

गुंड पवन पवारने महिलेच्या मुखत्यारपत्रावर बळजबरीने सह्या घेत मिळकत बळकावलीच याशिवाय, २० लाख रुपये देखील बळकावले. महिलेच्या पतीच्या नावे असलेल्या सर्व मिळकतींची कागदपत्रे संशयित विशाल पवार याच्या नावे करीत असलेल्या नोटरी व रजिस्टर जनरल मुखत्यार पत्रावर बळजबरीने स्वाक्षरी घेतली.

एप्रिल 2023 सालची ही घटना आहे. फिर्यादीने नाशिक पोलिसांच्या सुरु असलेल्या कारवाया पाहाता आता तक्रार देण्याचे धाडस केले. या तक्रारीवरून पवन पवारसह विशाल पवार, कल्पेश किरवे (रा. विठ्ठल मंदिराजवळ, जेलरोड) या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हे तिघेही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान पवन पवारच्या घरावर देखील पोलिसांनी छापा टाकला होता.

दरम्यान पवन पवार विरोधात नाशिकरोड व उपनगर पोलीस ठाण्यात स्वतःचे शुभेच्छा फलक अवैधरीत्या लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे तसेच पवन पवार व त्याच्या साथीदारांचे एक रील सोशल मीडीयावर व्हायरल झाले होते. गँगस्टर शैलीतील रॅप साँग तयार करत ते रिल्स पोस्ट करून लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी देखील पवन पवार व त्याच्या साथीदारांवर याआधीच गुन्हा दाखल आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT