Nashik Politics : संदीप कर्णिक इफेक्ट! इच्छुक म्हणतात, 'यंदा होर्डिंग नको रे बाप्पा', शहरानेही घेतला मोकळा श्वास!

CP Sandeep Karnik effect : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या दिवाळीत राजकीय नेत्यांचे फ्लेक्स लागले नाहीत. यामुळे आता शहरानेही मोकळा श्वास घेतला असून सध्या याची शहरभर जोरदार चर्चा सुरू आहे.
CP Sandeep Karnik
CP Sandeep Karniksarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. नाशिक पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्हेगार व गुन्हा दाखल असलेल्यांच्या फ्लेक्सवर कारवाई करत दिवाळीत मोठा धडाका दिला.

  2. या कारवाईमुळे गुन्हेगार आणि राजकीय इच्छुकांनी फ्लेक्स लावण्याची हिंमतच केली नाही.

  3. आगामी स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या या भूमिकेचे कौतुक होत आहे.

Nashik Police Effect News : महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांचे अमाप पीक आले आहे. मात्र या सगळ्यांनी पोलिसांची धास्ती घेतली. त्यामुळे कोणाचीही फ्लेक्स लावण्याची हिंमत ऐन दिवाळीत झालेली नाही. त्यामुळेच सध्या नाशिक शहरात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या इफेक्टची चर्चा जोरदार सुरू आहे.

नाशिक शहराची यंदाची दिवाळी नागरिकांना धक्का देऊन गेली आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्हेगार आणि गुन्हा दाखल असलेल्यांचे फ्लेक्स लावल्यावरून कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे अनेक नेत्यांना पोलिसांचा प्रसाद मिळाला.

दिवाळी असूनही नाशिक शहरात महापालिका निवडणुकीची कोणतीही चाहूल दिसत नाही. त्याचे मुख्य कारण इच्छुकांनी फ्लेक्स लावण्याची हिंमतच केलेली नाही. त्याला सीपी कर्णिक यांनी यांच्या कारवाईचा बडगा आहे. तर राजकीय आशीर्वादाने गुन्हेगारी करणाऱ्यांनीही याचा धसका घेतला आहे.

CP Sandeep Karnik
Nashik Politics: भाजपमधील इच्छुकांना खुणावतेय उद्धव ठाकरेंची शिवसेना!

सत्ताधारी महायुतीच्या चार नगरसेवकांची दिवाळी पोलीस कोठडीत झाली. यामध्ये भाजपचे स्थायी समितीचे माजी सभापती उद्धव निमसे, माजी नगरसेवक बाळासाहेब पाटील, मुकेश शहाणे आणि आरपीआयचे प्रकाश लोंढे यांचा समावेश आहे. याशिवाय सत्ताधारी पक्षाचे विविध पदाधिकारी पोलिसांच्या रडारवर आहेत.

गुन्हेगारी, खून, मंडळी यांसारख्या गंभीर प्रकरणात राजकीय नेत्यांचा सहभाग आढळला आहे. उमेदवारांनी मंत्री आणि राजकीय नेत्यांच्या आशीर्वादातून नाशिक शहराला वेठीस धरले होते. त्यात सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचाही या गुन्हेगारांना आशीर्वाद असल्याचे स्पष्ट झाले होते. शहरातील गुन्हेगारीने उच्छाद मांडल्याने सामान्य नागरिक त्रस्त झाले होते. त्यामुळे याबाबत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हस्तक्षेप करणे भाग पडले. त्याचा दणका सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या समर्थकांना आणि माजी नगरसेवकांना बसला आहे.

शहरात हजारो होर्डिंग लावून राजकीय नेते इच्छुक उमेदवार आणि गुन्हेगारांनी दहशत वाढविण्यासाठी हा मार्ग निवडला होता. गुन्हेगारांचे फोटो असलेल्या होर्डिंग वर थेट कारवाई केली. गुन्हे दाखल झाल्याने अनेक राजकीय नेत्यांची झोप उडाली. सध्या दिवाळी असली तरी कोणीही नागरिकांना शुभेच्छा देणारे फलक लावण्याची हिंमत केली नाही. पाडवा पहाट यांसारख्या कार्यक्रमाचेही मोजके आणि कार्यक्रम असलेल्या परिसरातच फ्लेक्स लागले. विशेष म्हणजे त्यावर नेत्यांचे फोटो गायब होते.

CP Sandeep Karnik
Nashik Politics : भाजपला नाशिकमध्ये मोठा धक्का, माजी नगरसेविका पतीसह चालल्या ठाकरेंच्या शिवसेनेत

FAQs :

1. नाशिकमध्ये पोलीस कारवाई का करण्यात आली?
→ गुन्हेगार आणि गुन्हेगारीला प्रोत्साहन देणारे फ्लेक्स लावल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.

2. ही कारवाई कोणी केली?
→ नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी ही कठोर कारवाई केली.

3. या कारवाईचा परिणाम काय झाला?
→ गुन्हेगार व राजकीय इच्छुकांनी फ्लेक्स लावणे बंद केले आणि शहरात शिस्त दिसून आली.

4. कारवाई दिवाळीतच का करण्यात आली?
→ दिवाळीमध्ये फ्लेक्स लावण्याचा ट्रेंड वाढल्यामुळे पोलिसांनी त्या काळात कडक पाऊले उचलली.

5. नागरिकांची या कारवाईवर प्रतिक्रिया काय आहे?
→ नागरिकांनी पोलिसांच्या शिस्तप्रिय भूमिकेचं स्वागत केलं असून स्वच्छ नाशिक उपक्रमाला पाठिंबा दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com