Sujay Vikhe 2 Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP Sujay Vikhe : 'नावं, व्हॉट्सॲप चॅट, कॉल्स, सर्व काही माझ्याकडे'; सुजय विखे गद्दारांशी घेणार पंगा

Central Government schemes Shirdi former BJP MP Sujay Vikhe Maharashtra Assembly elections : भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी विधानसभा निवडणुकीवेळी राहाता मतदारसंघातील गद्दारांना इशारा दिला आहे.

Pradeep Pendhare

Maharashtra Assembly Elections : विधानसभा निवडणुकीत गद्दारांशी पंगा घेण्याचं भाजपचे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी ठरवलं आहे. विधानसभा निवडणुकीत आमच्याशी गद्दारी करणाऱ्यांची नावं मला माहिती आहेत.

"संघटनेत काम करताना चुका माफ होतील. पण गद्दारी करणाऱ्यांना माफ करणार नाही. व्हॉट्सॲप चॅट, कॉल्स, बैठका, सर्व माहिती माझ्याकडे आहे. कोणीच सुटणार नाही", असा थेट इशारा माजी खासदार सुजय विखे पाटलांनी दिला आहे.

घनकचरा किंवा सांड पाण्याचे शुद्धिकरण करून शेतकऱ्यांना पाण्याचा उपयोग होईल असा प्रकल्प देशामध्ये सर्वप्रथम शिर्डीमध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आल्याची माहिती डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe) पाटील यांनी दिली. केंद्र सरकार पुरस्कृत अमृत 2.0, मलनिःसरण प्रकल्पांतर्गत टर्शरी ट्रिटमेंट प्लँट लोकार्पण सोहळ्यानिमित्त विखे पाटील बोलत होते. शिर्डी परिसरात पाण्याची दुरवस्था लक्षात घेता, पुढील आठवड्यात गोदावरी नदीच्या रूंदीकरणाचे 190 कोटींचे काम देखील सुरू होणार असल्याची माहिती विखे पाटलांनी दिली.

'चाऱ्यांवर कोणतेही अतिक्रमण असो, नगरसेवक असो की नगराध्यक्षांचे असो, शेतकऱ्यांचे पाणी अडवले जाणार नाही, असे स्पष्ट शब्दांत सांगून डॉ. सुजय विखे पाटील यांनी चाऱ्यांवरील अनधिकृत अतिक्रमण हटविण्याचे आश्वासन दिले. मागील महिन्यापासून शिर्डीत (Shirdi) होत असलेल्या बदलांचे दर्शन घडत आहे. हे कोणत्याही व्यक्ती विरोधातील द्वेषातून नव्हे, तर गुन्हेगारीच्या विरोधातील कारवाई आहे.जिथे गुन्हेगार, दारू भट्ट्या आहेत, त्यांचा पत्ता सांगा, दुसऱ्या दिवशी तिथे जेसीबी जाईल आणि त्या भट्ट्या उद्ध्वस्त केल्या जातील', असेही सुजय विखे पाटलांनी सांगितले.

सुजय विखे पाटील यांनी व्हीआयपी दर्शनासंदर्भात देखील भूमिका मांडली. ग्रामस्थांनी आणि सर्व पक्षांनी मिळून व्हीआयपी दर्शन संदर्भात ठाम भूमिका मांडावी. श्री क्षेत्र तिरुपतीच्या धर्तीवर श्री क्षेत्र शिर्डी इथं काकड आरतीनंतर दोनच तास व्हीआयपी दर्शन चालू व्हावे. तसेच व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली जो धंदा चालू आहे, त्याला कुठेतरी आळा बसवून सर्वसामान्य जनतेला व समस्त साईभक्तांना दर्शन घेण्यासाठी कोणताही त्रास होणार नाही, यासाठी सर्वांनी लक्ष घालावे असे आवाहन केले.

संस्थानकडे याबाबत येत्या आठ दिवसांत निवेदन दिले जाणार, असून त्यानंतर संस्थानाला याबाबत पूर्तता करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी दिला जाईल. त्यानंतर निर्णय न झाल्यास, विखे पाटील शिर्डीच्या प्रांगणात उपोषणाला बसतील, असा इशाराही विखे पाटलांनी दिला.

विधानसभा निवडणुकीत आमच्याशी गद्दारी करणाऱ्यांची नावं मला माहिती आहेत. संघटनेत काम करताना चुका माफ होतील, पण गद्दारी करणाऱ्यांना माफ करणार नाही. व्हॉट्सॲप चॅट, कॉल्स, बैठका, सर्व माहिती माझ्याकडे आहे. कोणीच सुटणार नाही, असा इशारा देताना नेते कितीही दगाफटका करत असतील, तरी जनतेच्या मनात फक्त विखे पाटीलच आहेत, असे ठामपणे सुजय विखे पाटलांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT