Ahilyanagar News : अहिल्यानगरमधील शिर्डीतला ग्रो-मोअर कंपनीतील साडेतीनशे कोटी रुपयांच्या घोटाळ्याला वेगळं वळण लागलं आहे. गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्या मुख्य आरोपींकडून कोटी रुपये उकळल्याचा आरोपावरून स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलिस कर्मचारी मनोहर गोसावी, बापूसाहेब फोलाणे आणि गणेश भिंगारदे या चौघांना पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी निलंबित केले आहे.
तर याप्रकरणात साईसंस्थानमधील राजाराम भटू सावळे, भाऊसाहेब आनंदराव थोरात, सुबोध सुकदेव पाटील आणि संदीप भास्कर सावळे चार कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्याने त्यांना देखील निलंबित करण्यात आल्याचे संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरख गाडीलकर यांनी सांगितले.
जादा परतव्याचे आमिष दाखवत गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याच्या ठपका शिर्डीतल्या (Shirdi) ग्रो-मोअर कंपनीवर आहे. या कंपनीत हजारो गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली आहे. यानंतर परताव्यात फसवणूक होऊ लागल्याने गुंतवकणूकदारांच्या तक्रारी वाढू लागल्या. या कंपनीच्या चौकशीसाठी विधिमंडळात लक्षवेधी देखील उपस्थित करण्यात आली होती. यानंतर ग्रो-मोअर इन्व्हेस्टमेंट फायनान्स कंपनीचे संचालक व इतर सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिस (Police) अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी या कंपनीच्या चौकशीसाठी स्थानिक गुन्हे शाखेतील चौघा अधिकाऱ्यांचे पथक स्थापन केले. तसेच चौकशी अधिकारी म्हणून आर्थिक गुन्हे शाखेतील पोलिस निरीक्षक शरद गोर्डे यांची नियुक्ती करण्यात आली होती. कंपनीचा मुख्य संचालक भूपेंद्र राजाराम साबळे याला पथकाने लोणीजवळ ताब्यात घेत, आरबीआयचा परवाना नाही, तरी लोकांकडून गुंतवणुकीच्या नावाखाली लोकांची फसवणूक करतो म्हणून, तुझ्यावर गुन्हा दाखल होईल, असे धमकावले. यानंतर त्याच्याकडे 1 कोटी 50 लाख रुपयांची मागणी केली.
या पथकाने भूपेंद्र व त्याचे दोन भाऊ व मित्रांना पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात घेऊन आले. तिथं देखील दीड कोटी रुपये ऑनलाईन देण्याची मागणी केली. पोलिसांनी पैसे घेऊन प्रकरण दाबल्याच्या तक्रारीनंतर, पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी चौकशी केली. यात तथ्य आढळल्यानंतर या चौघांना निलंबित करण्यात आले.
दरम्यान, या कंपनीच्या संचालकांविरोधात दाखल गुन्ह्यात साई संस्थानाच्या चौघा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. गुन्हा दाखल होऊन देखील ते संस्थानमध्ये कार्यरत होते. मुख्य आरोपी भूपेंद्र याचे वडील राजाराम भटू साबळे (प्रसादालय विभाग), भाऊसाहेब आनंदराव थोरात, सुबोध सुकदेव पाटील (श्री साईबाबा रुग्णालय) आणि संदीप भास्कर सावळे (साईआश्रम), अशी चौघांची नावे आहेत. या चौघांवर निलंबनाची कारवाई केल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरख गाडीलकर यांनी दिली.
भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या घोटाळ्याची गंभीर दखल घेतली. अतिरीक्त जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, अतिरीक्त पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, प्रांताधिकारी माणिक आहेर यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यात ग्रो-मोअर कंपनीच्या घोटाळ्याची व्याप्तीवर चर्चा झाली. या बैठकीत गुन्ह्याच्या सखोल चौकशीसाठी पोलिस यंत्रणांना सूचना मंत्री विखे यांनी दिल्या. यामध्ये शिर्डी संस्थानमधील कर्माचाऱ्यांची मोठी गुंतवणूक केली आहे. काही कर्माचारीच कंपनीचे प्रतिनिधी म्हणून काम करतीत असल्याचे उघड झाल्याने या कर्मचाऱ्यांनी भाविकांची फसवणूक केली का, याचाही तपास करण्याची सूचना पोलिसांना मंत्री विखे यांनी दिले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.