Utkarsha Rupwate sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Utkarsha Rupwate: वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रुपवतेंच्या वाहनावर हल्ला, हल्लेखोर फरार

Roshan More

Shirdi Political News : वंचित बहुजन आघाडीच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात गाडीच्या समोरील काचा फुटल्या आहेत. झाडीतून दगडफेक करत हल्लेखोर पळून गेले. या हल्लानंतर उत्कर्षा रुपवते यांनी कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे आवाहन केले.

प्रस्थापित उमेदवारांना रूपवते Utkarsha Rupwate यांचा निवडणुकीत धोका वाटत आहे. उत्कर्षा रुपवते यांचा जोरदार झंझावात सुरू असल्यानेच राजकीय सुडातून हा हल्ला झाला असल्याचा दावा वंचितकडून VBA करण्यात येतो आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उत्कर्षा रूपवते यांनी सांगितले की, मी रात्री अकोले राजूर (जिल्हा अहिल्यानगर) येथील प्रचारदौरा संपवून संगमनेरला परत येत असताना माझ्या कारवर दगडफेक झाली. मी सुखरूप आहे. कार्यकर्त्यांनी कृपया संयम राखा. आपल्याला निवडणुक तडीस न्यायची आहे.

शिर्डीत तिरंगी लढत

शिर्डी मतदारसंघात महाविकास आघाडी, महायुती आणि वंचित यांच्यामध्ये तिरंगी लढत होत आहे. महाविकास आघाडीकडून भाऊसाहेब वाकचौकरे, महायुतीकडून सदाशिव लोखंडे तर वंचितककडून उत्कर्षा रुपवते निवडणूक रिंगणात आहेत. 13 मेला शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT