Loksabha Election : बारामतीत निवडणूक आयोगाच्या विरोधात तक्रार, नेमकं घडलं काय?

Election Commission : बारामती लोकसभा मतदारसंघातील एका उमेदवाराचे चिन्ह सीसीटीव्ही आहे. आज निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदान केंद्रावर सीसीटीव्ह बसवले. तसेच सीसीटीव्ही बसवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
Election Commission
Election CommissionSarkarnama
Published on
Updated on

मिलिंद संगई

Baramati Loksabha : निवडणुकीत आचारसंहितेचे पालन होते की नाही, हे पाहणाचे काम निवडणूक आयोगाचे आहे. मात्र, निवडणूक आयोगानेच आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार बारामतीत दाखल करण्यात आली आहे. त्यासाठी उमेदवाराच्या चिन्हाला जबाबदार धरण्यात आले आहे. निवडणूक आयोगाकडूनच आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याची तक्रार मुख्य निवडणूक आयुक्त व निवडणूक आयोगाकडे बारामतीचे अॅड. तुषार झेंडे यांनी ही तक्रार दाखल केली आहे.

Election Commission
Dharashiv Loksabha : मतदानादिवशीच धाराशिव लोकसभा मतदारसंघ हादरला; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याची भोसकून हत्या

बारामती लोकसभा Baramati Loksabha मतदारसंघातील एका उमेदवाराचे चिन्ह सीसीटीव्ही आहे. आज निवडणूक आयोगाने Election Commission प्रत्येक मतदान केंद्रावर सीसीटीव्ह बसवले. तसेच सीसीटीव्ही बसवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. अॅड. तुषार झेंडे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार जे चिन्ह उमेदवाराचे आहे त्या चिन्हाचाच प्रचार व प्रसार प्रत्येक मतदान केंद्रावर होत असल्याचा आक्षेप नोंदवण्यात आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जाहीर प्रचार संपल्यानंतर उमेदवारांना वास्तविक जाहीर प्रचार संपल्यानंतर उमेदवारांना जाहीररित्या त्यांच्या चिन्हाचा प्रचार करता येत नाही. मात्र निवडणूक आयोगाने एका उमेदवाराचे चिन्ह सीसीटीव्ही असताना देखील मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही लावत अप्रत्यक्ष त्या उमेदवाराचा प्रचारच केला, असा आक्षेप अॅड.तुषार झेंडे यांनी घेतला. हे चिन्ह गोठविले गेले नाही त्या मुळे त्या चिन्हाचा प्रचार आयोगानेच केला असेच चित्र निर्माण झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Election Commission
Arvind Kejriwal News : ...त्यांनी खूप चलाखी केली! सुप्रीम कोर्टात केजरीवालांच्या जामिनाला 'ईडी'चा कडाडून विरोध

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com