Chhagan Bhujbal 1 Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal Nashik : कोण होणार नाशिकचा पालकमंत्री? मंत्री छगन भुजबळ म्हणाले...

NCP Chhagan Bhujbal Reacts on Nashik Guardian Minister Post After Sai Samadhi Darshan in Shirdi : महायुती सरकारमध्ये मंत्रि‍पदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळ यांनी शिर्डीमध्ये येत साई समाधीचं दर्शन घेतलं.

Pradeep Pendhare

Nashik politics 2025 : महायुती सरकारमधील नाशिक अन् रायगड जिल्ह्याचा पालकमंत्रीपदाचा वाद मिटलेला नाही. त्यामुळे या दोन जिल्ह्यात कोण पालकमंत्री? अन् कोण होणार पालकमंत्री? या प्रश्नाचं उत्तर कधी मिळणार हे एक कोड होऊ बसलं आहे.

आता तर नाशिकमधून महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची एन्ट्री झाली. त्यामुळे नाशिकच्या पालकमंत्रीपदासाी आणखी एक दावेदार वाढला, अशी चर्चा आहे. कोण होणार नाशिकचा पालकमंत्री? या प्रश्नाचा तिढा अधिकच वाढला आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी यावर शिर्डी इथं प्रतिक्रिया दिली.

मंत्रिपदाची नवीन जबाबदारी पार पाडताना यश मिळावे. जनतेची सेवा करता यावी, अशी साईचरणी प्रार्थना केली. नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या वादात मला पडायचे नाही. त्यावरून वाद-विवाद वाढविण्याचे काही कारण नाही, असे मत नव्याने मंत्रिपदाची शपथ घेतलेले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

मंत्री भुजबळ यांनी शिर्डी (Shirdi) इथं साई समाधीचे दर्शन घेतले. साईसंस्थाने उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी साईमंदिर विभागप्रमुख विष्‍णुपंत थोरात, जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे आदी उपस्थित होते.

मंत्री भुजबळ म्हणाले, "सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींना 27 टक्के आरक्षण दिले आहे. आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुका येत आहेत. या निर्णयामुळे ओबीसींना दिलासा मिळेल". खऱ्या गरजूपर्यंत आरक्षणाचा लाभ जायला हवा. राजकारणात मी आजवर दहावेळा मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिपद येत जात असते, असेही मंत्री भुजबळ यांनी म्हटले.

खासदार तटकरे यांची प्रतिक्रिया...

मंत्रिमंडळातील सर्वांत ज्येष्ठ सदस्य असलेल्या भुजबळ यांच्याकडे नाशिकचे पालकमंत्रिपद सोपविले जाईल, अशा चर्चा आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "राज्याच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांचा झालेला समावेश आणि नाशिकचे पालकमंत्रिपद याचा कोणताही परस्पर संबध नाही. या दोन्ही जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती देण्यात आलेली आहे. त्याबाबतचा निर्णय लवकरात लवकर व्हावा, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची इच्छा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार हे तिघे त्यावर निर्णय घेतील".

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT