
Independent MLC Nashik : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे अपक्ष आमदार सत्यजीत तांबे भाजपमध्ये जाणार असल्याच्या जोरात चर्चा सुरू आहेत. या चर्चा थांबायला तयार नाहीत. थोरात यांचा विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर, तर या चर्चांना अधिकच वेग आला आहे.
आमदार सत्यजीत तांबे यांनी यावर 'सरकारनामा'शी बोलताना यावर सूचक विधान केल्याने, या चर्चांना अधिक हवा मिळाली आहे. त्यामुळे भविष्यात संगमनेरमध्ये मोठ्या राजकीय उलथापालथी घडतील की काय? अशी संकेत मिळत आहेत.
नाशिक (Nashik) पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी दैनिक सकाळ माध्यम समूहाच्या 'सरकारनामा' या डिजिटल प्लॅटफॉर्मशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. संगमनेर शहरातील खाद्यसंस्कृतीची त्यांनी ओळख करून दिली. ही खाद्यसंस्कृती लोकांना जोडते, असंही आमदार तांबे यांनी कौतुकानं सांगितलं.
'स्वल्पविराम'मधील पुरी-भाजी, 'जोशी' हाॅटेलमधील जिलेबी संगमनेरकरांच्या भावनेचं ठिकाण, तर 'नडे' यांची भेळ, 'सरस्वती'चा वडा, 'गोंगे' यांची लस्सी, 'क्षेत्रिया' यांचं आईस्क्रिम असेल किंवा 'पंचारिया' यांचं वडा-मिसळ, 'आवजीनाथ'चा पाववडा ही खाद्यांशिवाय संगमनेरकर अपूर्ण असल्याचं कौतुक आमदार तांबे (Satyajeet Tambe Patil) यांनी सांगितलं. याशिवाय 'गाय-छाप' ही देखील संगमनेरकरांच्या खाद्यसंस्कृतीचा भाग असल्याचा मिश्किल टिप्पणी देखील आमदार तांबे यांनी केली.
संगमनेरची खाद्यसंस्कृतीची ओळख सांगत असतानाच, आमदार तांबे यांनी भाजपमध्ये जाणार असल्याच्या प्रश्नावर सूचक, असं विधान केलं. भाजपमध्ये कधी जाणार? या प्रश्नावर बोलताना आमदार तांबे यांनी, "माझं असं काही नाही, फडणवीससाहेब आहेत, जे लोकं मला मार्गदर्शन करतात, ज्यावेळी ते सांगतील, त्यावेळी पाहू. आता अपक्ष आहे, अपक्ष ठीक आहे".
अहिल्यानगर जिल्हा परिषद अध्यक्ष होण्याची संधी होती, होऊ दिलं नाही. त्यांनी राजीनामा दिला नाही. हा इतिहास आहे. यावर सत्यजीत तांबे म्हणाले, "मी जिल्हा परिषद अध्यक्ष झालो असतो, तर मी अजून मोठा नेता झालो असतो. दुसरं मन सांगतं, प्रत्येक गोष्टीची वेळ असते, योग्य वेळी योग्य संधी मिळते. त्यामुळे वाईट वाटून घ्यायचं नाही. मिळालेल्या संधीचं सोनं करायचं, काम करत राहायचं, मी अतिशय संतुष्ट राहणारा व्यक्ती आहे. मी त्याचाच फार पडत नाही".
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.