Kishori Pednekar 1 Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Kishori Pednekar on Disha Salian Case : मंत्री राणेंनी काय 'दिशा' द्यायची, त्यांनी द्यावी; साईंच्या शिर्डीत किशोरी पेडणेकरांनी निर्णय केलाय 'पक्का'

Shiv Sena Thackeray Kishori Pednekar Sai Samadhi Darshan Shirdi BJP Minister Nitesh Rane Disha Salian case : शिर्डी साई समाधीचं दर्शन घेतल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या किशोरी पेडणेकर यांनी दिशा सालियन प्रकरणावरून भाजप मंत्री नीतेश राणे यांच्यावर टीका केली.

Pradeep Pendhare

Shirdi Sai Samadhi Darshan : दिशा सालियन मृत्यूप्रकरण पुन्हा एकदा समोर आलं आहे. दिशाच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, यात आमदार आदित्य ठाकरे, शिवसेनेच्या मुंबईतील नेत्या तथा माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह काही जणांवर गंभीर आरोप केलेत.

यावरून गदारोळ सुरू असतानाच, किशोरी पेडणेकर यांनी शिर्डीत साईचरणी हजेरी लावली. साई समाधीचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी भाजप मंत्री नीतेश राणे यांच्यावर निशाणा साधला.

दिशा सालियन मृत्यूप्रकरणात आदित्य ठाकरेंवर आरोप करताना भाजप (BJP) मंत्री नीतेश राणे आणि त्यांचे कुटुंब पुरावे असल्याचे दावा करताता. त्यावर किशोरी पेडणेकर यांनी मंत्री राणे यांना लंलकारलं. त्या म्हणाल्या, त्यांचेकडे पुरावे आहेत तर सादर करावे. त्यांना काय 'दिशा' द्यायची त्यांनी द्यावी. आमचा निर्णय पक्का झालाय. ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना न्याय मिळाला पाहिजे".

न्यायालयात प्रकरण गेलं म्हणून शिर्डीत आले असं नाही. रामनवमी निमित्ताने मुंबईतून (MUMBAI) अनेक पालख्या निघतात. त्या पालख्यांना भेट देत देत, आम्ही आज शिर्डीत पोचलो. साईबाबा आमचे वडील आहेत. मी सच्चाईने काम केलंय, त्यामुळे ते आमच्यासोबत आहे. कोर्टावर आमचा विश्वास आहे. लोकशाहीने चालणारे कोर्ट आहे. आम्ही साईबाबांच्या चरणी येवू शकतो, अशा काही वल्गना करणाऱ्यांच्या नाही, असंही किशोरी पेडणेकर यांनी भाष्य केले.

"मी महापौर होते तेव्हा तिचे वडील अनेकदा भेटायला यायचे. मी त्यांना भेटले त्यावेळी तेथील नगरसेवक, पोलिस , मीडिया आणि रुपाली चाकणकर देखील येणार होत्या. मी एकटी गेली नव्हते. आई-वडिलांचं सांत्वन केलं. त्यांचं म्हणणं होत की, आमच्या मुलीची बदनामी करतायत. आमचं कमावते कोणी नाही. महिला बालकल्याण अंतर्गत मदत मिळते का? असं त्यांचं म्हणणं होतं. दबाव आणण्याचा विषय नव्हता. महापौर म्हणून टार्गेट करत असतील, तर अशा अग्निपरीक्षेला मी सामोर जाईल", असेही किशोरी पेडणेकर यांनी म्हटले.

माझा संविधानावर विश्वास आहे. अचानक ऊत आलाय त्यांना, कोर्ट बघेल. तोंडी काही होत नाही, असे म्हणताना, त्यांची ताकद ही EVM मशिनची आहे. जोर जबरदस्तीची ताकद दिसली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत, एवढे ते घाबरतात, असा टोला देखील किशोरी पेडणेकर यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT