Shivsena UBT : शिंदेंना रोखण्यासाठी भास्कर जाधव मैदानात, उत्तर रत्नागिरीला देणार आक्रमक चेहरा

Bhaskar Jadhav : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय कदम यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर ठाकरे गटाला उत्तर रत्नागिरीसाठी अद्याप जिल्हाप्रमुखासाठी खंबीर नेतृत्व मिळालेले नाही. पण नव्या दमाच्या खांद्यावर ही जबाबदारी दिली जाऊ शकते.
Bhaskar Jadhav
Bhaskar Jadhavsarkarnama
Published on
Updated on

Ratnagiri News : शिवसेनेला कोकणात खिंडार पाडले जात असून अनेक चेहरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसह भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करत आहेत. नुकताच संजय कदम यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. तर त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. यामुळे ठाकरेंना उत्तर रत्नागिरीसह कोकणात मोठा धक्का बसल्याचे मानले जात होते. तर अनेक दिवसापासून जिल्हाप्रमुखाच्या निवडीचा विषय भीजतच होता. पण आता लवकरच जिल्हाप्रमुखाच्या निवडी घोषणा मातोश्रीवरून होणार असून यासाठी आमदार भास्कर जाधव अॅक्टीव्ह झाले आहेत. तर ते जो चेहरा देतील तो मान्य असेल अशी ग्वाही चिपळूणमधील शिवसैनिकांनी दिली आहे.

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय कदम यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर नव्या जिल्हाप्रमुखाच्या निवडीसाठी उत्तर रत्नागिरीत आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत जिल्हाप्रमुखपदासाठी काही तरुण चेहऱ्याचे नाव समोर आली आहेत. तर यातील एकाच्या नावावर मातोश्रीवरून अंतिम घोषणा होईल असे भास्कर जाधव यांनी संकेत दिले आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यात शिवसेनेच्या पक्षवाढीसाठी ऑपरेशन टायगर सुरू केलं आहे. यामध्ये कोकणासह जिल्ह्यातील मोठे मासे गळाला लागली आहे. तर तत्कालीन जिल्हाप्रमुख सचिन कदम, गुहागर विधानसभा मतदार संघाचे तालुकाप्रमुख संदीप सावंत, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळकृष्ण जाधव यांच्यासह अनेकांनी शिवसेना सोडली. यानंतर ठाकरे यांनी विधानसभेच्या निकालानंतर जिल्हा संघटनेत मोठे बदल करत संजय कदम यांच्याकडे मोठी जबाबदारी दिली. त्यांना जिल्हाप्रमुखपद दिलं.

Bhaskar Jadhav
Shivsena UBT Politics: शिवसेना ठाकरे पक्ष आयुक्तांवर संतापला, आधी पाणी द्या, मग मीटर बसवा!

संदीप सावंत यांना डावलून जितेंद्र उर्फ पप्या चव्हाण यांच्याकडे गुहागर विधानसभा मतदार संघातील चिपळूण तालुकाप्रमुख म्हणून नियुक्ती केली. पण काहीच दिवसांपूर्वी संजय कदम यांनी जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा देत शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. आता याच रिक्त झालेल्या पदावर नियुक्तीवरून पेच निर्माण झाला असून योग्य चेहरा मिळत नसल्याने शिवसैनिकांत रोष आहे. तर शिवसैनिकांना शात करण्यासाठी ठाकरे गटाच्या हालचालींना वेग आला आहे. यासाठी सोमवारी (ता.1) चिपळूणसह गुहागर, खेड, दापोली, मंडणगड तालुक्यातील ठाकरे गटातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी आमदार भास्कर जाधव उपस्थित होते.

यावेळी जिल्हाप्रमुख हा उत्तर रत्नागिरी भागातील स्थानिक आणि आक्रमक असावा, अशी अपेक्षा पदाधिकाऱ्यांनी केली. तर काहींच्या मते हे पद दापोली खेड तालुक्यात देण्यात यावे अशीही मागणी आहे. तर काहींना चिपळूण किंवा गुहागरमधील पदाधिकारी असेल तरी चालेल असे मत व्यक्त केलं आहे. पण शिवसेना आता आक्रमक आणि नव्या दमाच्या नेतृत्वाची गरज असल्यावर सर्वांचे एकमत आहे. तर सर्व अधिकार आमदार भास्कर जाधव यांना देण्यात आलेले आहेत.

Bhaskar Jadhav
Shivsena UBT News : राजू शिंदेंचा उद्धवसेनेला जय महाराष्ट्र! राजीनामा पत्रात चंद्रकांत खैरेंवर नाराज असल्याचा उल्लेख

जाधव पक्षाला बुस्टर देणार?

एकीकडे पक्षातील प्रमुख चेहरेच साथ सोडत असनाचा नव्या चेहऱ्याला जिल्हाप्रमुख पद देवून पक्षाला बुस्टर देण्याचे काम भास्कर जाधव यांना करावे लागणार आहे. यासाठी त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. जिल्हाप्रमुख म्हणून नव्या दमाच्या तरुण पदाधिकाऱ्यांच्या नावावर एकमतही झाले आहे. पण त्याचे नाव अद्याप उघड करण्यात आलेले नाही. पण भास्कर जाधव यांनी शिंदेंच्या कोकणातील मनसुब्यांना सुरूंग लावण्यासाठी रणनीती आखल्याची चर्चा सध्या कोकणात सुरू आहे. आता भास्कर जाधव कोणता पत्ता ओपन करतात आणि कोणाच्या गल्यात जिल्हाप्रमुखाची माळ टाकतात? कोणाच्या नावाची शिफारस करणारा अहवाल मातोश्रीकडे देतात हे पाहावं लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com