Amabadas Danve|
Amabadas Danve| 
उत्तर महाराष्ट्र

राणेंना आणि त्यांच्या मुलांना शिवसेनेनं दोन वेळा पाडलं; दानवेंनी जखमेवर मीठ चोळलं...

सरकारनामा ब्युरो

नाशिक : ज्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यामुळं नारायण राणे मुख्यमंत्री झाले. त्यांनी उद्धव ठाकरेंना शिकवण्याची गरज नाही. विधानसभा निवडणूकीत नारायण राणेंंना दोन वेळा शिवसेनेने पाडलं, लोकसभेत त्यांच्या मुलाला दोनवेळा शिवसेनेनेचंं पाडलं. अशा व्यक्तींनी शिवसेनेला शिकवू नये, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. मनमाडमध्ये ते बोलत होते.

उद्धव ठाकरे यांनी गोरेगावमध्ये झालेल्या सभेत भाजप आणि शिंदे गटावर अत्यंत तीव्र शब्दांत टीका केली होती. त्यावर नारायण राणेंनी उत्तर देताना ठाकरेंवरही टीका केली होती, हे चार खासदार, दहा आमदार निवडून आणू शकत नाही. यांनी किती मराठी लोकांना रोजगार दिला. काल जे बोलले की, खोका, गिधाडं आता संजय राऊतांची सोबत करायला त्यांना जावं लागणार आहे. खोक्यांची चौकशी होणार असून यांच्या मागेही ईडी लागणार,अशा शब्दात टीका करत त्यांनी ठाकरेंना इशाराही दिला.

या टीकेला अंबादास दानवेंनी सडेतोड उत्तर दिलं आहे. ''जो केंद्रीय मंत्री जामिनावर सुटला आहे. ज्यांचं घर पाडण्याचे आदेश हाय कोर्टाने दिलेत, असे लोक उद्धव ठाकरेंवर आरोप करत आहेत. काही लोकांना असं वाटतं शिवसेना (Shiv Sena) संपली. पण याच शिवसेनेला हरवण्यासाठी शिवसेनेचेच आमदार फोडले, तुम्हाला मनसेची साथ घ्यावी लागते. इतकच नाही तर दिल्लीतल्या सगळ्या सत्ताधाऱ्यांची मदत घ्यावी लागते, यातच शिवसेनेची खरी ताकद दिसून येते, यावरून शिवसेना संपली नाही तर जिंकली आहे, असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

दरम्यान,महाविकास आघाडी सरकार काळात, तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीसांनी पोलिसांना बोनस देण्याची मागणी केली होती. पण आता ते स्वत: सत्तेत आहेत त्यामुळे फडणवीसांनी त्यांच्या मागणीचाही विचार करावा, असाही टोलाही त्यांनी लगावला.

राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. राज्य सरकारने दहा दिवसांपूर्वीच त्यावर एनडीआरएफच्या निकषांनुसार मदत जाहीर केली आहे. पण गेल्या १० दिवसांत एकाही शेतकऱ्याच्या खात्यात एकही रुपया मदत जमा झाली नाही. पण ही मदत तोकडी असून ती सर्वच शेतकऱ्यांना मिळणार नाही. शेतकऱ्यांना आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. राज्य सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा आणि त्यांना तातडीची मदत करावी, अशी मागणीही दानवेंनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT