Nashik Politics : निवडणुकांमुळे महापालिकेतील प्रशासकीय राजवट आता संपुष्टात आली आहे. नाशिक महापालिकेत भाजपसोबत शिवसेना देखील सत्तेत बसली आहे. भाजपच्या हिमगौरी आहेर आडके या महापौर तर शिवसेनेचे विलास शिंदे हे उपमहापौर आहेत. दरम्यान सत्तेत बसलेल्या शिवसेनेने प्रशासनाविरोधात दंड थोपाटले असून चार वर्षांच्या प्रशासकीय काळातील कामांचा हिशोब शिवसेनेने प्रशासनाकडे मागितला आहे.
चार वर्षांपासून महापालिकेत प्रशासकीय राजवट आहे. मात्र आता निवडणुका झाल्यानंतर महापौर, उपमहापौर यासह स्थायी समितीच्या सभापती पदाची निवडणूक देखील पार पडली आहे. त्यामुळे प्रशासक कालावधीत काय कामे झाली, प्रशासनाने जबाबदारी कशा पद्धतीने पार पाडली, यासंदर्भात नवनिर्वाचित नगरसेवकांना अनेक प्रश्न असून त्यामुळे शिवसेनेने प्रशासकीय काळात झालेल्या कामांचा हिशोब प्रशासनाकडे मागितला आहे. या कामांची श्वेतपत्रिका सादर करण्याची मागणी शिवसेनेचे गटनेते अजय बोरस्ते यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.
शिवसेनेने (शिंदे गट) यासंदर्भात आयुक्तांना निवेदन दिले असून, चांगले कामे झाले असेल तर प्रशासनाचे कौतुक होईल तर चुकीची कामे झाली असेल तर त्याचा जाबदेखील विचारला जाणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. पालिका प्रशासनाने पारदर्शक व जबाबदार कारभाराच्या दृष्टीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केल्यास नगरसेवक व नागरिकांचा नाशिक महापालिका प्रशासनावरील विश्वास अधिक वाढेल, त्यातून वेगाने विकास करता येईल त्यामुळे सविस्तर माहिती मिळावी असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
शिवसेनेला या सदंर्भात हवीय माहिती
महापालिकेचे एकूण उत्पन्न (कर, अनुदाने, इतर महसूल स्रोत).,महसुली व भांडवली खर्चाचे तपशील, आस्थापना खर्च, विकासकामांवर झालेला खर्च व प्रलंबित कामांची स्थिती. कुंभमेळ्यासाठी आर्थिक तरतूद व प्रत्यक्ष खर्च,कर्ज व आर्थिक दायित्वांचा तपशील, महापालिकेचे अंदाजपत्रक हे जमेची आहे का तुटीचा आर्थिक आढावा, भविष्यातील आर्थिक नियोजन व शाश्वत उत्पन्नवाढीसाठी उपाय, नगरसेवकांच्या विकासकामांसाठी निधीची तरतूद ही माहिती शिवसेनेला हवी असून श्वेतपत्रिका काढण्याची मागणी शिवसेनेने केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.