Chandrakant Raghuvanshi  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shiv Sena News: ‘छटाकभर गावात 2-2 दुकाने!’; शिवसेना आमदाराचा पक्षालाच घरचा आहेर, गटबाजीवर सुनावले

Shiv Sena MLA Chandrakant Raghuvanshi Statement: नंदुरबार-धुळे पट्ट्यातील शिवसेनेतील अंतर्गत मतभेद चर्चेत आले आहेत. जुने आणि नव्याने पक्षात आलेले कार्यकर्ते यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याचे दिसते.

सरकारानामा ब्युरो

सागर निकवाडे

  • चंद्रकांत रघुवंशींची नाराजी: ‘पक्षाला नाट लागली, छटाकभर गावात दोन-दोन दुकाने’ म्हणत शिंदे गटातील गटबाजीवर थेट टीका.

  • कठोर भूमिका घेण्याचा सल्ला: संपर्कप्रमुख शिरीष चौधरी यांनी मवाळ भूमिका न घेता कार्यकर्त्यांना शिस्त लावून एकत्र आणावे, असे रघुवंशी म्हणाले.

  • निवडणुकांपूर्वी आव्हान: जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर अंतर्गत मतभेद शिंदे गटासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता.

नंदुरबार : शिवसेनेतील मधील अंतर्गत गटबाजीवर विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. "पक्षाला नाट लागली आहे, छटाकभर गावात दोन-दोन दुकाने थाटली आहेत," अशा शब्दांत त्यांनी पक्षातील स्थानिक गटबाजीवर थेट टीका केली.

रघुवंशी यांच्या या वक्तव्यामुळे नंदुरबार-धुळे पट्ट्यातील शिवसेनेतील अंतर्गत मतभेद चर्चेत आले आहेत. जुने आणि नव्याने पक्षात आलेले कार्यकर्ते यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याचे त्यांच्या भूमिकेतून दिसून येते.

‘दोन-दोन गटांमुळे पक्षाचे नुकसान’

छोट्या गावांमध्येही पक्षाचे दोन-दोन गट निर्माण झाले असून, या कुरघोडीचा फटका संघटनेला बसत असल्याचे रघुवंशी यांनी सांगितले. गटबाजीमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होत असून पक्षाची एकजूट टिकवण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

संपर्कप्रमुखांना कठोर भूमिका घेण्याचा सल्ला

शिवसेनेचे संपर्कप्रमुख शिरीष चौधरी यांना रघुवंशी यांनी गटबाजीवर कठोर भूमिका घेण्याचा सल्ला दिला. **मवाळ भूमिका घेऊन हा प्रश्न सुटणार नाही; कार्यकर्त्यांना शिस्त लावून सर्वांना एकत्रितपणे काम करण्यास भाग पाडले पाहिजे,** असे त्यांनी स्पष्ट केले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी आव्हान

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका तोंडावर असताना पक्षातील मतभेद उघड होणे शिंदे गटासाठी अडचणीचे ठरू शकते. त्यामुळे स्थानिक पातळीवरील गटबाजी रोखून संघटनेत समन्वय निर्माण करण्याचे आव्हान पक्ष नेतृत्वासमोर आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT