Delhi News: दिल्लीत बी. डी. मार्गावर खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा भीषण अपघात झाला. सुदैवाने यातून हेमंत गोडसे बचावले असून, कारचे नुकसान झाले. या अपघातात गोडसे यांच्या सोबत असलेल्या व्यक्तींना किरकोळ दुखापत झाल्याचे सांगण्यात आले. (MP Hemant Godse Car Accident in Delhi)
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाचे दिल्लीत आयोजन करण्यात आले असून, संसदेमध्ये महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी गोडसे संसदेत गेले होते. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर ते पुन्हा त्यांच्या निवासस्थानाच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला.
एका वाहनाला ओव्हरटेक करत असताना समोरून येणाऱ्या एका वाहनाने त्यांच्या वाहनाला जोरात धडक दिली. सुदैवाने गोडसे यांच्यासह त्यांचे सहकारी बचावले. यात वाहनाचे मोठे नुकसान झाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
गोडसे हे नाशिक लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. काही दिवसांपूर्वी गोडसे यांचा एक कथित व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाल्याने गोडसे देशभरात चर्चेत आले होते. सध्या शिवसेनेच्या शिंदे गटात दाखल झालेले हेमंत गोडसे तिसऱ्या टर्मसाठी निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. मात्र, या जागेवर भाजपनेसुद्धा दावा केला आहे.
भाजपचा दावा मान्य झाल्यास गोडसे काय भूमिका घेणार, याची उत्सुकता सर्वांना आहे. लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाल्यापासून भाजपने गोडसे यांच्या नावाला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष विरोध दर्शवला आहे.
तिसऱ्या टर्मसाठी इच्छुक असलेल्या हेमंत गोडसे यांना एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेच्या हक्काचा असताना तो भाजप हिरावून घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
त्यापूर्वी त्यांचा एक विवादास्पद व्हिडिओ व्हायरल झाला. सिन्नर तालुक्यातील विवादास्पद कला केंद्राला मंजुरी मिळावी, यासाठी लिहिलेले त्यांचे पत्रही चर्चेत आले आहे. तत्पूर्वी त्यांच्या एका सहकाऱ्यावर आयकर विभागाने कारवाई केली होती. आता त्यांच्या वाहनाचा अपघात झाला.
(Edited By-Ganesh Thombare)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.