Hemant Godse : व्हिडिओ व्हायरल तरी हेमंत गोडसेंनाच पसंती; नाशिकचा सर्व्हे काय सांगतो ?

Nashik BJP : भाजपला सर्वाधित 22 टक्के लोकांचा पाठिंबा
Hemant Godse
Hemant Godse sarkarnama
Published on
Updated on

Nashik Political News : लोकसभा निवडणुकीमुळे राज्यातील वातावरण चांगलेच गरम झाले आहे. विरोधकांना नामोहरम करण्याची एकही संधी हातची जाणार नाही, याची काळजी सर्वच पक्षांकडून घेण्यात येते आहे. काही दिवसांपूर्वी खासदार हेमंत गोडसे यांचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतरही खासदार गोडसे यांनाच सर्वाधिक पसंती असल्याचा एक सर्व्हे व्हायरल होत आहे. भाजपने नाशिक लोकसभेच्या जागेची मागणी केल्याबरोबरच हा सर्व्हे मतदारसंघात फिरलवा जात आहे. यातून भाजप आणि गोडसे यांच्यातील दूरावा वाढण्याची शक्यता आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघ (Nashik) शिवसेनेच्या ताब्यात असून, येथे मागील दोन टर्मपासून हेमंत गोडसे खासदार आहेत. तिसऱ्या टर्मसाठी गोडसेंची जोरदार तयारी सुरू आहे. मात्र, नाशिक लोकसभेत भाजपलाही मोठा रस असून, ही जागा मिळण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांकडून वरिष्ठ पातळीवर करण्यात आली आहे. यामुळे गोडसे यांची चांगलीच पंचाईत झाली आहे.

Hemant Godse
Onion Export : शेतकऱ्यांसाठी खूषखबर! निवडणूक आली; केंद्राने कांदा निर्यातबंदी हटवली

नाशिक लोकसभा मतदारसंघात यापूर्वी शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी अशी सरळ लढत झालेली आहे. आता पक्षफुटीमुळे मतदारसंघ नेमका कोणत्या पक्षास मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. सध्याचे खासदार हे शिवसेना शिंदे गटात असून, तिसऱ्या टर्मसाठी इच्छुक आहेत. त्यासाठी मात्र, खासदार गोडसे (Hemant Godse) हे एकटेच किल्ला लढवताना दिसतात. त्यांना अद्याप पक्षाकडून म्हणावी तशी साथ मिळत नाही. तुलनेत नाशिकच्या जागेसाठी भाजप चांगलाच आक्रमक आहे. भाजपपुढे पहिले आव्हान खासदार गोडसे यांचेच आहे. गोडसे यांच्याबाबत मतदारांचे मत प्रतिकूल असल्याचा दावा सातत्याने करण्यात येतो. यासाठी भाजपच्या सर्व्हेचा आधार घेण्यात येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Hemant Godse
Latur Congress News : जिथे आहात, तिथेच खंबीरपणाने उभे राहा, काकांचा पुतण्यांना सल्ला

भाजप (BJP) या सर्व्हेआडून खासदार गोडसेंना नामोहरण करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. आता त्याविरोधात गोडसे यांच्या गटाकडून हालचाली सुरू केलेल्या आहेत. आता त्यांच्या फॅन क्लबकडून एक सर्व्हे रिपोर्ट व्हायरल केला जात आहे. त्यात मतदारांची सर्वाधिक पसंती गोडसे यांनाच असल्याचा दावा करण्यात आला आहे. यानंतर मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा क्रमांक आहे. तर नाशिकमधून भाजप पक्षाला सर्वाधिक म्हणजे 22 टक्के लोकांचा पाठींबा असल्याचे सर्व्हेत नमूद करण्यात आले आहे.

उमेदवार म्हणून गोडसे आणि पक्ष म्हणून भाजप बाजी मारू शकतो, असा निष्कर्ष असलेला सर्व्हे नेमका कोणी आणि कधी केला, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. दरम्यान, सर्व्हेबाबत बोलताना गोडसे म्हणाले, ‘सगळ्याच पातळ्यांवर सर्वेक्षण होत असतात. त्यापैकी हा एक असू शकतो. हा सर्व्हे कोणी केला हे आपल्याला माहिती नाही. पण, त्यात तथ्य असू शकते’ असेही गोडसेंनी सांगितले.

(Edited by Sunil Dhumal)

Hemant Godse
Most Popular CM: ना योगी, ना ममता, ना केजरीवाल..; कोण आहेत सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com