Nadurbar BAzar Samiti
Nadurbar BAzar Samiti Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Bazar Samiti Result : नंदुरबार बाजार समितीत शिवसेनेचा भाजपला धक्का

सरकारनामा ब्यूरो

Bazar Samiti Result : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत महाविकास आघडी आणि युतीत मोठी चुरस निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान नंदुरबार बाजार समितीत मात्र भाजप विरुद्ध शिंदे गट यांच्यातील लढत लक्षवेधील ठरली. या निवडणुकीत शिंदे गटाने भाजपला मोठा धक्का दिला. शिवसेनेने १८ पैकी ११ जागांवर विजय प्राप्त केला आहे. दरम्यान, भाजपने आक्षेप घेतल्याने मतमोजणी पुन्हा करण्यात येत आहे.

नंदुरबार बाजार समितीत (Nandurbar) भाजप नेते, मंत्री डॉ. विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit) यांना मोठा धक्का बसला आहे. बाजार समितीच्या १८ जागांपैकी ११ जागांवर शिवसेने जिंकल्या आहेत. दरम्यान, ही निवडणूक डॉ. विजयकुमार गावित यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जात होती. मात्र शिंदे गटाच्या विक्रम वळवी यांनी गावित यांना मोठा धक्का दिला आहे.

दरम्यान, नंदुरबार बाजार समितीच्या निवडणुकीत डॉ. गावित यांचे बंधू प्रकाश गावित (Prakash Gavit) यांच्या नेतृत्वाखाली पॅनल उतरला होता. त्यांना शिवसेनेचे विक्रम वळवी (Vikram Walvi) यांनी तगडे आव्हान दिले होते. त्यामुळे गावितांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली होती. या निवडणुकीत शुक्रवारी (ता. २८) ९७.८७ टक्के मतदान झाले. या बाजार समितीसाठी दोन हजार ७२७ पैकी दोन हजार ६६९ मतदारांनी हक्क बजावला. त्यामुळे या बाजार समितीवर कुणाची सत्ता स्थापन होणार, याकडे लक्ष लागले होते.

या निवडणुकीची मतमोजणी शनिवारी (ता. २९) पार पडली. यावेळी धक्कादायक निकाल समोर आला. त्यात शिवसेनेने १८ पैकी तब्बल ११ जागांवर विजय मिळविला. विक्रम वळवी यांनी प्रकाश गवितांचा नऊ मतांनी पराभव केला. दरम्यान, या निवडणुकीच्या मदतमोजणीवर गावितांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे पुन्हा मतमोजणी करण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT