Shivsena Protest News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahmednagar Politics : गुन्हा दाखल असलेल्या ठेकेदारालाच 72 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचं काम!

Shevgaon Shivsena Protest News : शिंदे गटाच्या वतीने शेवगाव मुख्याधिकारी यांच्याविरोधात उपोषण सुरू...

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar News : नगर जिल्ह्यातील शेवगाव शहरासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महा अभियानांतर्गत सरकारने मंजूर केलेल्या जवळपास 72 कोटी रुपये खर्चाच्या शेवगाव पाणीपुरवठा योजनेचे काम चुकीच्या ठेकेदाराला दिल्याचा आरोप करत शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वतीने शेवगाव मुख्याधिकारी यांच्याविरोधात उपोषण सुरू केले आहे.

शिंदे गटाचे शेवगाव युवासेना प्रमुख साईनाथ अधाट कार्यकर्त्यांसह उपोषणाला बसले असून शेवगाव नगर परिषदेचे मुख्याधिकाऱ्यांनी या अगोदरच यवतमाळ जिल्ह्यात गुन्हा दाखल झालेल्या ठेकेदारास हे ल यामध्ये मोठा भ्रष्टाचार केला असल्याचा गंभीर आरोप केला आहे.राज्यात मुख्यमंत्रिपदी शिवसेना सत्तेत असताना त्यांच्याच एकनाथ शिंदे गटाचे कार्यकर्ते सध्या शेवगाव तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले दिसून येत आहेत.

शेवगाव शहराला गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याचा पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. सध्याही परिस्थिती पाहिली तर किमान पंधरा दिवसानंतर एकदा पाणी येते. यामुळे 60 हजार लोकवस्तीच्या शेवगाव शहरातील नागरिक त्रस्त असून पिण्याच्या पाण्यासाठी त्यांना वणवण करावी लागत आहे. या परिस्थितीत नुकतेच महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत शेवगाव शहरासाठी पाणीपुरवठा योजनेचे काम मंजूर झालेले आहे. हे काम जवळपास 72 कोटी रुपये खर्चाचे असल्याची माहिती आहे.

भ्रष्टाचार केल्याचा आरोप...

दरम्यान, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभिमान अंतर्गत योजनेस मंजुरी मिळाल्यानंतर शेवगावचे मुख्याधिकारी सचिन राऊत यांनी हे काम इंद्रायणी कन्स्ट्रक्शन या संस्थेला दिले आहे. शिंदे गटांच्या पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, इंद्रायणी कन्स्ट्रक्शन ठेकेदारावर यापूर्वीच यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा नगरपरिषदेचे पाणी योजनेचे काम पूर्ण न केल्याने आणि त्यात अनियमितता दिसल्याने गुन्हा दाखल झालेला आहे. अशा परिस्थितीत गुन्हा दाखल झालेल्या ठेकेदाराला शेवगाव येथील पाणीपुरवठा योजनेचे काम देऊन मुख्याधिकाऱ्यांनी यामध्ये मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याबाबत शिंदे गटाचे युवासेना जिल्हाप्रमुख साईनाथ आधाट आणि तालुकाप्रमुख आशुतोष डहाळे यांनी कार्यकर्त्यांसह तहसील कार्यालयासमोर उपोषण आंदोलन सुरू केले आहे. गुन्हा दाखल असलेल्या ठेकेदाराला काम देऊन मुख्याधिकारी यामध्ये भ्रष्टाचार करत आहेत, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.

तसेच हे ठेकेदाराचे काम रद्द करण्यात यावे. जोपर्यंत या दोन्ही कार्यवाही होत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असा इशारा शिवसेना युवा शाखेच्या वतीने देण्यात आलेला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT