EC to Rahul Gandhi : 'पनौती' टीकेवरून निवडणूक आयोगाची राहुल गांधींना नोटीस, उत्तर देण्यासाठी शनिवारपर्यंत मुदत

EC Notice To Rahul Gandhi : पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेवरून काँग्रेस नेते राहुल गांधी अडचणीत येण्याची शक्यता आहे...
Rahul Gandhi
Rahul Gandhi Sarkarnama
Published on
Updated on

Rajasthan Election 2023 : काँग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. राजस्थानमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदींना 'पनौती' म्हणत त्यांनी टीका केली होती. भाजपने यावर आक्षेप घेत राहुल गांधींविरोधात निवडणूक आयोगात टीका केली होती. भाजपच्या तक्रारीची दखल घेत निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. या नोटीसला उत्तर देण्यासाठी निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना शनिवारपर्यंत मुदत दिली आहे.

Rahul Gandhi
BJP News : राहुल गांधी अडचणीत येणार? PM मोदींना पनौती म्हटल्याने भाजपची निवडणूक आयोगात धाव

विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाल्यावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल करत 'पनौती', 'पाकीटमार' आणि कर्जमाफी संबंधी टीका केली होती. भाजपने बुधवारी निवडणूक आयोगात राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत राहुल गांधी आणि खर्गेंवर कारवाई करण्याची मागणी भाजपने केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपने काय म्हटले तक्रारीत?

राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गेंवर कारवाई व्हायला हवी. कारण अशा वक्तव्यांमुळे निवडणुकीचे ( Rajasthan Election ) वातावरण बिघडू शकते. तसेच प्रतिष्ठीत व्यक्तींना बदनाम करण्यासाठी अपशब्द, आक्षेपार्ह भाषेचा वापर आणि खोट्या बातम्या रोखणं अवघड होईल, असे भाजपने म्हटले होते. यासोबत राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणीही भाजपने केली आहे.

Rahul Gandhi
Rahul Gandhi On Modi : " मोदी म्हणजे पनौती, भारतीय टीम चांगलं खेळत होती पण..."; राहुल गांधींनी डिवचलं

इंदिरा गांधीवरूनही भाजपने साधला निशाणा

दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी आणि गृहमंत्री बुटा सिंग हे राजधानी दिल्लीत १९८२ मध्ये एशियाड हॉकी फायनल बघण्याासाठी गेले होते. त्यावेळी पाकिस्तानने भारताचा ७-१ असा पराभव केला होता. भारताचा सामन्यात पराभव होत असल्याचे पाहून त्यावेळी इंदिरा गांधी या सामना मध्येच सोडून निघून गेल्या होत्या. हा भारतीय संघाचा अपमान होता. आणि इंदिरा गांधींच्या वर्तनाने भारतीय संघाचे मनोधैर्य खचले होते, असे म्हणत भाजप राहुल गांधींच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

Edited by Sachin Fulpagare

Rahul Gandhi
Himanta Biswa Sarma On WC Final : 'वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा पराभव इंदिरा गांधींमुळे... ; भाजपच्या मुख्यमंत्र्यांची मुक्ताफळे!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com