Kiran Kale rape case 1 Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shivsena Kiran Kale rape case : शिवसेना शहरप्रमुखाला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक; ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना वेगळाच संशय

Shiv Sena Thackeray Ahilyanagar Chief Kiran Kale Arrested in Rape Case : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे शहरप्रमुख किरण काळे यांना बलात्काराच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

Pradeep Pendhare

Ahilyanagar rape case news : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे अहिल्यानगर शहरप्रमुख किरण काळे यांना बलात्काराच्या गुन्ह्यात कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. कर्जतमधील एका 21 वर्षीय विवाहित युवतीने तक्रार दाखल केली आहे. गुन्हा दाखल होताच, किरण काळे यांना मध्यरात्री कोतवाली पोलिसांनी ताब्यात असून, न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

दरम्यान, किरण काळेंविरोधात दाखल गुन्ह्यामागे शिवसेना ठाकरे सेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना वेगळाच संशय आहे. किरण काळे यांना अडकवले जात असून, दाखल गुन्ह्याती सखोल चौकशी होऊन सत्य काय आहे ते बाहेर आणावे, अशी मागणी शिवसेना (Shivsena) ठाकरे पक्षाच्या युवासेनेचे राज्याचे सहसचिव विक्रम राठोड यांनी शहर पोलिस उपअधीक्षकांची भेट घेत केली.

21 वर्षीय पीडितेने किरण काळे याने 2023 पासून एप्रिल 2024 पर्यंत त्याच्या चितळे रोड इथल्या कार्यालयामध्ये तिला तिच्या पतीकडून होणाऱ्या त्रासातून वाचवण्यासाठी मदतीचं आमिष दिलं. मात्र त्या विश्वासाचा गैरफायदा घेत, संशयित आरोपीने तिच्यावर तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवले, असे फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकारानंतर पीडितेला धमकी देत संशयित आरोपीने तिला “जर हे कुणाला सांगितलं तर तुला जिवंत ठेवणार नाही,” असे म्हणत शिवीगाळही केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी किरण काळे यांना कोतवाली पोलिसांनी (Police) अटक केली आहे. आज दुपारी त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांना वेगळाच संशय आहे. युवासेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड यांनी शहर पोलिस उपअधीक्षक अनिल भारती यांची भेट घेतली.

शहरप्रमुख किरण काळे यांनी अलीकडेच अहिल्यानगर महापालिकेतील 776 रस्त्यांच्या कामामध्ये झालेल्या अंदाजे 400 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे गंभीर स्वरूप जनतेसमोर मांडले. त्यांनी सरकारी निधीच्या अपहाराबाबत ठोस पुरावे सादर करून सरकार आणि प्रशासनाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

पूर्वनियोजत कटकारस्थान

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या प्रश्नासंदर्भामध्ये सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सु‌द्धा पत्र पाठवून या मुद्द्याकडे लक्ष वेधले होते. या सर्व घडामोडीनंतर कोतवाली पोलिस ठाण्यात त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ अटक करण्यात आली, ही बाब अत्यंत धक्कादायक, अन्यायकारक आणि पूर्वनियोजित असल्याचे दिसते. हा सर्व प्रकार दडपशाहीखाली आणि कटकारस्थानाचा भाग आहे, असा आरोप विक्रम राठोड यांनी केला.

मानवाधिकार आयोगाकडे धाव घेणार

खोटे आरोप लावून किरण काळे यांची बदनामी करण्यामागे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महापालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याचा संशय आहे. एका बोगस तक्रारीच्या आधारे त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करून पोलिस प्रशासनाचा गैरवापर होताना दिसतो आहे. खासदार संजय राऊत यांनी देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून लोकायुक्त व मानवाधिकार आयोगाकडे तक्रारी दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, असेही विक्रम राठोड यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT