Ajit Pawar, Eknath Shinde sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ajit Pawar News : अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचीच माणसे अडचणीत का येत आहेत?

Sampat Devgire

Sushma Andhare News : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पुणे 'हिट अ‍ॅण्ड रन' केस विषयी सूचक वक्तव्य केले आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे महायुतीतील भाजपच्या सहकारी पक्षांना जाणीवपूर्वक अडचणीत तर आणले जात नाही ना? अशी चर्चा सुरू होऊ शकते.

पुणे 'हिट अ‍ॅण्ड रन' केस मध्ये भारतीय जनता पक्षाचे (BJP) अनेक नेते एवढ्या मोठ्या प्रमाणात रस का घेत आहेत? या प्रकरणात घटना घडल्यानंतर लगेचच मध्यरात्री अनेक बडे प्रस्थ यामध्ये का सामील झाले? त्यांची एन्ट्री यामध्ये वेगळे राजकारण शिजत असल्याची शंका तर निर्माण करीत नाही ना? अशी शंका सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सुषमा अंधारे म्हणाल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांनी या प्रकरणात एक पत्र दिले होते. ते पत्र व्हायरल झाल्यावर त्यांनी तातडीने आपला खुलासा केला. या प्रकरणातून अंग काढून घेण्याचा देखील प्रयत्न केला. या प्रकरणाची एवढी चर्चा झाल्यामुळे अनेक मोठी मंडळी अडचणीत आली आहेत. यामध्ये प्रामुख्याने उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाची नावे पुढे येत आहेत. या दोन्ही नेत्यांना व त्यांच्या पक्षांना अडचणीत आणण्याचा कोणी घाट तर घातला नाही ना? अशी शंका या संपूर्ण प्रकरणातून येते.

त्या म्हणाल्या मुंबईत घाटकोपरला घडलेल्या घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला. त्याची चर्चा तीनच दिवस झाली.डोंबिवलीत सहा मजूर ठार झाले. त्याच्यावरही विशेष चर्चा झाली नाही. मात्र पुण्याच्या 'हिट अ‍ॅण्ड रन' केसची एवढी चर्चा का घडविली जात आहे? असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. यामध्ये अचानक एवढे बडे प्रस्थ का दाखल होत आहेत. या प्रकरणातील अल्पवयीन संशयित मद्यपान करताना चा फोटो व्हायरल झाला आहे. त्यात त्याच्यासोबतचे इतर सर्वांचे फोटो ब्लअर करण्यात आलेले आहे. कदाचित ते अल्पवयीन असल्यामुळे तसे झाले असावे, त्याविषयी मला नेमकी माहिती नाही. मात्र यामागे नेमका हेतू काय असा देखील प्रश्न पडतो.

या प्रकरणातील एक संशयित अजय तावरे हा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याची या प्रकरणातील एकंदर भूमिका विचारात घेतल्यास त्याबाबत मी कोणतेही विधान करू इच्छित नाही. कारण तो अत्यंत महत्त्वाचा घटक असून पुरावे नष्ट करण्यासाठी अन्य यंत्रणा काहीही करू शकतात. त्यात अजय तावरेच्या जीवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरच या विषयावर मी अधिक मतप्रदर्शन करेल, असेही अंधारे यांनी सांगितले.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT