Pune Porsche Accident : माज उतरेना! बाप-लेकाकडून पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे; चालकाचे धक्कादायक खुलासे

Pune Porsche Crash News : गुन्ह्याची व्याप्ती पाहता सखोल तपास होणे गरजेचे असल्याचं पोलिसांनी न्यायालयात सांगितलं. त्यानंतर न्यायालयानं अगरवाल बाप-लेकाला 31 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
vishal agarwal surendrakumar agarwal
vishal agarwal surendrakumar agarwalsarkarnama

Pune Accident Porsche : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे वडील आणि आजोबा तपासात सहकार्य करीत नसून उडवाउडवीची उत्तरे देत असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी मंगळवारी ( ता. 27 ) न्यायालयात दिली. तसेच, त्यांनी सीसीटीव्ही फुटेजमध्ये छेडछाड केल्याचं प्रथमदर्शनी समोर आल्याचं पोलिसांनी सांगितलं.

'पोर्श' कार धूम स्टाइलनं चालवत तरूण-तरूणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाचा गुन्हा आपल्या अंगावर घेण्यासाठी चालकाचे अपहरण करून त्याचा मोबाईल फोन काढून घेत धमकल्याप्रकरणी सुरेंद्रकुमार अगरवाल ( Surendrakumar Agarwal ) ( वय, 77 ) आणि विशाल सुरेंद्रकुमार अगरवाल ( Vishal Agarwal ) ( वय, 50 ) यांना गुन्हे शाखेनं अटक केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यातील सुरेंद्रकुमार अगरवालच्या पोलिस कोठडीची मुदत मंगळवारी ( ता. 28 ) संपली आहे. विशाल अगरवलला या गुन्ह्यात सोमवारी ( ता. 27 ) रात्री अटक करण्यात आली. या दोघांना मंगळवारी एकाचवेळी न्यायालयात हजर करण्यात आलं. तेव्हा तपासाची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. याप्रकरणी मोटारचालक गंगाधर शिवराज हेरीक्रुब यांनी फिर्याद दिली आहे.

धमकावून सनसिटी येथील बंगल्यात नेलं

हेरीक्रुब यांनी फिर्यादीत सांगितलं, येरवडा पोलिस ठाण्यातून मी माझ्या घरी जाताना सुरेंद्रकुमार अगरवाल यांनी मला बोलावून घेतलं. धमकी देत इच्छेविरुद्ध मर्सिडीज कारमध्ये बसवून ब्रह्मा सनसिटी येथील त्यांच्या बंगल्यात नेलं. सुरेंद्रकुमार आणि विशाल अगरवाल यांनी संगमनत करून मला धमकावून माझा मोबाईल फोन काढून घेतला. बंगल्यात बेकायदा लपवून ठेवण्याच्या उद्देशानं मला डांबून ठेवण्यात आलं. त्यानंतर अल्पवयीन मुलानं केलेला गुन्हा तुझ्या नावावर घे आणि कोणाशी बोलला तर याद राख, अशी धमकी दिली.

vishal agarwal surendrakumar agarwal
Pune Accident Porsche : पोर्श कारमधील 'तो' दुसरा मुलगा कोण ? अपघात होऊन दहा दिवसानंतरही माहिती गुलदस्त्यातच !

फिर्यादीच्या अपहरणासाठी वापरलेली कार जप्त

आरोपींनी त्यांचे गंगाधर यांचे अपहरण करण्यासाठी वापरलेली मर्सिडीत कार जप्त करण्यात आली आहे. आरोपींनी धमकावून गंगाधर यांचा फोन काढून घेतला होता. त्या मोबाईलबाबत आरोपींकडे तपास केला असता ते उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. त्यांच्याकडून मोबाईल जप्त करायचा आहे, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली.

vishal agarwal surendrakumar agarwal
Pune Porsche Crash Case: 'हिट अ‍ॅण्ड रन' प्रकरणी मोठी अपडेट; 'पोर्श’ मोटारीच्या तपासणीतून धागेदोरे लागणार हाती..!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com