Himgauri-Aher-Adke Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

NMC Politics: खड्ड्यांच्या प्रश्नावर शिवसेनेचा बिनतोड सवाल, आजवर कोणावर गुन्हा दाखल केला ते सांगावे?

Shiv Sena UBT aggressive, catches BJP and Mayor Himgauri Adake in a dilemma-शिवसेना ठाकरे पक्षाचे महानगरप्रमुख प्रथमेश गीते यांचा इशारा, शिवसेना आता महापालिकेची लढाई रस्त्यावर नेणार?

Sampat Devgire

Prathmesh Gite News: शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने उद्धव ठाकरेंची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न केला. त्याला ठाकरेंच्या शिवसेनेनेही विनाविलंब प्रत्युत्तर दिले आहे. नगरसेवकांच्या या राजकारणात कोंडी मात्र सत्ताधारी भाजपची होण्याची चिन्हे आहेत. 

कंत्राटदारांना स्टार रेट देण्यावरून प्रशासन विरुद्ध सत्ताधारी भाजप असा संघर्ष पाहायला मिळाला. दुसरीकडे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने ठाकरे पक्षाचे नगरसेवक फोडण्यासाठी फासे टाकले. त्यामुळे ऑपरेशन टायगर चर्चेत आले. आता त्यातून शिंदे गटाची कोंडी करण्याचा प्रयत्न आहे.

महापालिकेच्या या राजकारणात चोख उत्तर देण्याची संधी उद्धव ठाकरे यांना मिळाली आहे. महानगर प्रमुख, नगरसेवक प्रथमेश गीते आणि गटनेते केशव पोरजे यांनी ही संधी साधली आहे. त्यामुळे महापालिकेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच वाद भेटण्याची चिन्हे आहेत. 

शहरातील रस्ते आणि खड्डे यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहे. नागरिकांची ही दुखरी नस ओळखून शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष सक्रिय झाला आहे. नागरिकांसह रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा प्रथमेश गीते यांनी दिला आहे. 

महापौर हिमगौरी आडके-आहेर यांनी रस्त्यांच्या प्रश्नावर महासभा घेतली. त्यात नादुरुस्त रस्ते व खड्डे याबाबत कंत्राटदारांना चोख इशारा दिला होता. रस्त्यांना खड्डे झाल्यास कंत्राटदारांवर गुन्हा दाखल करण्याची घोषणा त्यांनी केली. 

महापौर आडके- आहेर यांची हीच घोषणा भाजपची कोंडी करण्यात कारणीभूत ठरण्याची चिन्हे आहेत. गेल्या काही दिवसांत पाच नागरिकांचा खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात मृत्यू झाला. हा प्रश्न घेऊन शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आता आक्रमक झाला आहे. 

महानगर प्रमुख गीते यांनी कोणत्या कंत्राटदारांवर महापौरांनी गुन्हे दाखल केले हे जाहीर करावे, असे आव्हान दिले आहे. नागरिक त्रस्त झाले आहेत. महापालिकेत मात्र रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार होतो आहे. प्रचारामुळेच रस्त्यांवर खड्डे आहेत. त्याबाबत प्रशासन आणि सत्ताधारी बोटचेपी भूमिका घेत आहे. रोज अपघात आणि नागरिकांच्या जीवावर बेतत असतानाही महापालिका कोणावरही कारवाई करत नाही. याचे कारण काय? असा सवाल शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने केला आहे. 

शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. त्यातूनच उद्धव ठाकरे पक्षाने आंदोलनाचा इशारा देत नगरसेवकांना सक्रिय केले आहे. दोन्ही शिवसेनेतील या वादाचा फटका मात्र महापौर हिमगौरी आडके आणि भाजपला बसण्याची चिन्हे आहेत. 

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT