Shivsena UBT : नाशिकच्या जनतेला भ्रष्टाचाराच्या खड्ड्यात घालण्यासाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाणार तरी कोण? ठाकरेंचा शिलेदार कडाडला

Nashik : राम मंदिरातील देणगी चोरांना पाठीशी घालण्यासाठी ऑपरेशन टायगरची चर्चा घडवली? ऑपरेशन टायगरवर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने शिंदेंना चोख उत्तर दिले आहे.
Prathmesh Gite
Prathmesh GiteSarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT Nashik : नाशिकच्या नगरसेवकांबद्दल ऑपरेशन टायगर अचानक चर्चेत आले. त्यामुळे राजकीय खळबळ उडाली. त्याला शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने आता चोख उत्तर दिले आहे.

शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष केंद्रात, राज्यात आणि महापालिकेत सत्तेत आहे. सत्तेत सहभागी होण्यासाठीच त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा आटापिटा सुरू असतो. सत्तेत जाऊन त्यांनी काय केले? याचे उत्तर द्यावे, असे आव्हान शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख प्रथमेश गीते यांनी दिले आहे.

शहरातील 15 पैकी 12 नगरसेवक 'ऑपरेशन टायगर'मध्ये उद्धव ठाकरे पक्ष सोडणार अशी चर्चा आहे. त्याला महानगर प्रमुख गीते यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. कोणतेही नगरसेवक पक्ष सोडणार नाही, असा दावा त्यांनी केला.

शिवसेना उद्धव ठाकरे हा एकमेव पक्ष नाशिककरांच्या प्रश्नांवर आंदोलन करतो. आवाज उठवतो. पालिका प्रशासनाला जाब विचारतो. त्यामुळे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात गेलेले फुटीर नेते अस्वस्थ झाले आहेत. कारण सत्तेत राहून ते मिंधे झाले आहेत. त्यांना जनतेसाठी काहीच करता येत नाही.

Prathmesh Gite
Nashik Politics: नाशिक महापालिकेत ‘ऑपरेशन टायगर’ ऑन? ठाकरेंचे १२ नगरसेवक शिवसेनेत जाण्याची चर्चा: प्रत्येकी २ कोटी विकासनिधीचे आमिष

शहरात कुंभमेळ्याच्या कामांमध्ये सबंध शहर खड्ड्यात गेले. गटारी तुंबल्या. "एसआयआर" चा गंभीर प्रश्न आहे. गुन्हेगारी आणि कोयता गॅंग यांचा नागरिकांना रोज त्रास आहे. नागरिकांना महापालिका प्रशासन त्रस्त करीत आहे.

शहराच्या प्रश्नांवर उद्धव ठाकरे पक्ष आंदोलन करतो. त्याची चर्चा सत्ताधाऱ्यांना अस्वस्थ करते. त्यापासून जनतेचे लक्ष वळविण्यासाठी ऑपरेशन टायगर हे पिल्लू सोडून देण्यात आले आहे. अयोध्येच्या राम मंदिरातील देणगी चोरांना संरक्षण देण्याचे काम शिंदे सेना करीत आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आमचे नगरसेवक तिकडे जातील का? असा प्रश्न गीते यांनी केला.

Prathmesh Gite
Nashik: एकनाथ शिंदेंनी एजंट नेमले? ठाकरेंचे नगसेवक फोडण्यासाठी 5 कोटींचा निधी? नाशिकमध्ये दोन कट्टर शिवसैनिक भिडले

भाजप आणि शिवसेना शिंदे पक्षांनी प्रचंड सत्ता आणि संपत्तीचा वापर करूनही जनतेने उद्धव ठाकरे पक्षाचे 15 नगरसेवक निवडून दिले. जनतेचा कल काय आहे यातून दिसतो. त्यामुळे उद्धव ठाकरे पक्ष जनतेसाठी आणि नाशिकच्या भल्यासाठी यापुढे तेवढ्याच आक्रमकपणे सत्ताधाऱ्यांविरोधात आंदोलन करीत राहील, असा दावा गीते यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com