Girish Mahajan
Girish Mahajan sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

गिरीश महाजनांचा शिवसेनेला दे धक्का!

सरकारनामा ब्यूरो

जळगाव : चोपडा तालुक्यात शिवसेनेला (Shiv Sena) मोठा धकका बसला आहे. तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. जळगाव येथील जी. एम. फाऊंडेशन येथे हा प्रवेश सोहळा घेण्यात आला. यावेळी भाजप (BJP) नेते माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan), खासदार रक्षा खडसे, महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील उपस्थित होते. यावेळी प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा महाजन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या वेळी बोलताना आमदार गिरीश महाजन म्हणाले की, महविकास आघाडीच्या कारभाराला सर्व कंटाळले आहेत. त्यामुळे कार्यकर्ते आता पक्ष सोडत आहेत. जनतेचा भाजपवर विस्वास असून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते भाजपमध्ये येत आहेत. आगामी काळात भाजप मोठे यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

रक्षा खडसे म्हणाल्या की, चोपडा येथील शिवसेना आमदार यांच्या कडून कार्यकर्त्यांना त्रास होतो आहे, या बाबत आपल्याकडे तक्रारी आहेत. त्या मुळे आता शिवसेनेतून कार्यकर्ते बाहेर पडत आहेत. आगामी काळात जिल्हा परिषदेच्या चोपडा तालुक्यातील सर्व जागा भाजपच जिंकेल असा विस्वास त्यांनी व्यक्त केला. अड. एस डी सोनवणे, भरत पाटील, सुनील चौधरी, मनोज पाटील यांच्यासह ७० ते ८० जणांनी प्रवेश केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT